Supriya Sule: "जेव्हा जेव्हा बोलते, तेव्हा तेव्हा पतीला Income Tax ची नोटीस येते," संसदेतील भाषणांवरून सुप्रिया सुळे टार्गेट?

Sadanand Sule: सुप्रिया सुळे संसदेत आक्रमकपणे सरकारला प्रश्न विचारत असल्याने त्यांचे पती सदानंद सुळे यांना टार्गेट केले जात आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Supriya Sule And Sadanand Sule
Supriya Sule And Sadanand Sule
Updated on

बारामतीच्या खासदार आणि शरद पवार यांंच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे खळबळजन आरोप केले आहेत. सुप्रिया सुळे संसदेत आक्रमकपणे सरकारला प्रश्न विचारत असल्याने त्यांचे पती सदानंद सुळे यांना टार्गेट केले जात आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंंबईत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "संसदेत माझ्या भाषणानंतर माझे पती सदानंद सुळे यांना आयकर नोटीस मिळाली. ही काही पहिलीच वेळ नाही, प्रत्येक वेळी मी संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा अशाच नोटिसा येतात आणि त्यामधील प्रश्न सारखेच असतात."

गेल्या आठवड्यात संपलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेतील भाषणानंतर त्यांचे पती सदानंद सुळे यांना आयकर नोटीस मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

"आम्हाला अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लगेचच आयकर विभागाकडून नोटीस मिळाली. हा योगायोग आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु मी संसदेत बोलते तेव्हा प्रत्येक वेळी सदानंद सुळे यांना आयकराची नोटीस येते,” असे खासदार सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Supriya Sule And Sadanand Sule
Rahul Gandhi Portfolio: राहुल गांधींना शेअर बाजारातून 47 लाखांचा नफा, 'या' चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र तोटा

8 ऑगस्ट रोजी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर बोलताना सुळे यांनी सरकारला हे विधेयक पूर्णपणे मागे घेण्याची किंवा ते स्थायी समितीकडे पाठवण्याची विनंती केली होती. अखेर हे विधेयक छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले.

सुळे यांनी पुढे सांगितले की, त्यांनी आपल्या पतीला या नोटिसांबाबतची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पतीला यापूर्वीही सहा ते सात वेळा अशाच नोटिसा आल्या होत्या.

Supriya Sule And Sadanand Sule
Munawar Faruqui: "पाकिस्तानला पाठवायला वेळ लागणार नाही," मुनव्वरने उडवली कोकणवासीयांची खिल्ली; नितेश राणेंनी फटकारले

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याची माहिती त्यांनीच X वर पोस्ट करत दिली होती. यावेळी त्यांनी लोकांना कॉल किंवा मेसेज न करण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी नुकतेच सांगितले की, त्यांचा फोन हॅक झाल्यानंतर हॅकर्स सतत त्यांना मेसेजेस करत असून, त्यांच्याकडे 400 डॉलर्सची मागणी करत आहेत. हॅकर्स आपल्याला सतत ब्लॅकमेल करत असल्याचा दावा सुळे यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()