Maharashtra Politics: राज्यात पुन्हा खळबळ! 3 खासदार अन् 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदाराचा दावा

भाजपसोबत युती केल्यानंतर ठाकरे गटातूनच नाही तर इतर पक्षातूनही शिंदे गटात इन्कमिंग सुरू
Uddhav Thackrey
Uddhav Thackrey Esakal
Updated on

एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडीना वेग आला. दरम्यान एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी भाजपसोबत युती केल्यानंतर ठाकरे गटातूनच नाही तर इतर पक्षातूनही शिंदे गटात इन्कमिंग सुरू आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासारखे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर आता ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येतील असा दावाच खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

निवडणूकीच्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात 100 टक्के येतील असा दावा जाधव यांनी केला आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांच्यानंतर आता आणखी 3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा जाधव यांच्याकडून केला जातोय. ते बोलताना म्हणाले की, आम्ही लोकांमध्ये राहणारे आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहे. पण काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम आहे. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडे थांबलेले आहेत. जशा निवडणुका जवळ येतील शिवसेनेचे घर खाली झालेले असेल, असा दावाच प्रतापराव जाधव यांनी यावेळी केला आहे.

Uddhav Thackrey
Sanjay Raut : ‘भारत जोडो’ यात्रेत माणुसकी

दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतरच काही दिवसांत खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेले होते. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.