पावसाळ्यापूर्वी बसेस दुरुस्तीचे महामंडळापुढे आव्हान! गळक्या-नादुरुस्त गाड्यांची संख्या अधिक

ST bus
ST bus
Updated on

मुंबई : एसटी महामंडळाकडे कधीकाळी १८५०० पेक्षा जास्त एसटी बसेस होत्या ज्या मधून राज्यभरात सुमारे 65 लाख एसटी प्रवाशांचा प्रवास होत होता. मात्र गेल्या तीन वर्षात एसटी महामंडळातील बसेसची संख्या झपाट्याने घटली आहे. बसेसची वयोमर्यादा संपल्याने काही बसेस कालबाह्य झालेले आहे.

ST bus
रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई! अवैध मद्याच्या ३६३ बाटल्या, ६४ किलो तंबाखूजन्य पदार्थ जप्त

त्यामुळे एसटीच्या ताब्यात नवीन बसेस येणे अनिवार्य होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये नवीन बसेस एसटी महामंडळाने घेतल्या नसल्याने सध्या स्थितीत दुरुस्त बसेसची संख्या प्रचंड घटली आहे.

राज्यात साध्या बसेस ची आवश्यकता असताना फक्त 13000 बसेसच्या भरोशावर 65 लाख एसटी प्रवाशांना शिवाय नव्याने सवलती दिलेल्या महिला जेष्ठ नागरिक या प्रवाशांची वाहतूक करताना कसरत करावी लागत आहे. अशात पावसाळा सुरू होण्यापूर्वी नादुरुस्त आणि भंगार गाड्यांना दुरुस्त करण्याचे आव्हान सुद्धा महामंडळापुढे उभे ठाकले आहे.

ST bus
Pune News : पोहण्यासाठी गेलेला तरुण खडकवासला कालव्यात बुडाला; महिन्याभरात तिसरी घटना घडल्याने खळबळ

एस टी महामंडळात सद्यस्थितीत नवीन साध्या बसेस मुबलक प्रमाणात आल्या नसल्याने जुन्या बसेस मधून राज्यात प्रवासी सेवा सुरू आहे. हवामान खात्याने यावर्षी जोरदार पावसाळा होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसात प्रवासी सेवा नियमित सुरू ठेवायची असल्यास बसेसची दुरुस्ती करणे फार अनिवार्य आहे.

गेल्या काही दिवसात बसेसचे खिडक्या दरवाजे आपत्कालीन दरवाजा नादुरुस्त असल्याचे बसेस रस्त्यावर धावत असल्याचे व्हिडिओ फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. अशा बसेस पावसाळ्यातही प्रवासी वाहतुकीसाठी राहिल्यास प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

त्यामुळे महामंडळात सध्या स्थितीत असलेल्या ज्या बसेस आहे. त्या पावसाळ्यापूर्वीच संपूर्ण मेंटेनन्स करून बसेसची गळती थांबवून त्या प्रवासी सेवेसाठी तयार करण्याची नियोजन करावे लागणार आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये नियमितपणे बसेसचे मेंटेनन्स होत नसल्याने आता ऐनवेळी बसेस दुरुस्ती करण्याचे आव्हान एस टी महामंडळ पुढे असल्याचे दिसून येते.

एसटीचे वायपर, टायर, ब्रेक ,हेडलाईट, टेल लाईट, इंडिकेटर, हॉर्न अशा अनेक गोष्टी पावसाळ्यात दुरुस्त असणे फार गरजेचे असते. मात्र एसटीच्या बसेस मध्ये सध्या स्थितीतही या गोष्टी दुरुस्त असल्याची दिसून येत नाही. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरताना दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.