Nutrition : पोषण आहारात आढळला मृत बेडूक

राज्य सरकारच्या वतीने बालकांसाठी पुरवठा केलेल्या घरपोच आहाराच्या एका पाकिटामध्ये मृत बेडूक आढळला.
Nutrition
Nutrition sakal
Updated on

धाराशिव : राज्य सरकारच्या वतीने बालकांसाठी पुरवठा केलेल्या घरपोच आहाराच्या एका पाकिटामध्ये मृत बेडूक आढळला. हा प्रकार पाडोळी (आकुबाई) येथे गुरुवारी (ता. १) सायंकाळी निदर्शनास आला. याची माहिती मिळताच एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला.

सरकारतर्फे सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी घरपोच पोषण आहाराचा (टीएचआर) पुरवठा केला जातो. दर दोन महिन्याला लाभार्थींच्या संख्येनुसार जिल्ह्याची एकत्रित मागणी सरकारकडे नोंदविली जाते. त्यानंतर संबंधित कंत्राटदार हे गावोगावी जाऊन अंगणवाड्यांकडे हा आहार देतात. त्यानंतर लाभार्थीनिहाय त्याचे वितरण केले जाते. पाडोळी (आ.) येथील लाभार्थी बालकाची माता पूनम सौदागर जाधव यांना काल या तूरडाळ खिचडीचे तयार पाकीट दिले होते. त्यांनी ते पाकीट फोडले असता त्यात मृत बेडूक आढळून आला. अंगणवाडी पर्यवेक्षिका व्ही. व्ही. सुकाळे यांनी लाभार्थीच्या घरी भेट देऊन पाहणी केली. या पाकिटावर उत्पादनाची तारीख १४ जून २०२४ रोजी असून आणि बॅच क्रमांक ‘टीडीके बी पाच’ असल्याचे नमूद आहे.

पाडोळी (आकुबाई) येथे लाभार्थीला दिलेल्या पाकिटामध्ये मृत बेडूक आढळून आल्याचा अहवाल आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांनाही देण्यात आली आहे. लाभार्थीच्या घरी आज भेट दिली. गावात अन्य ठिकाणी दिलेल्या पाकिटांचीही तपासणी केली. शेजारील गावांनाही भेट देऊन तपासणी करणार आहे.

- अतुल कांबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी, धाराशिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.