भरत आला परत! 6 वर्षांनंतर आधारकार्डने घडवली माय-लेकराची भेट

आधार कार्ड बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये मिळाली पालकांची माहिती
los
los
Updated on
Summary

६ वर्षापूर्वी एक १३ वर्षाचा मूक-बधीर मुलगा आपल्या घरातून चॉकलेट खरेदी करण्यासाठी बाहेर पडला आणि पुन्हा घरी परतलाच नाही. त्याच्या आईने त्याला प्रत्येक ठिकाणी शोधले पण त्याचा पत्ता लागला नाही. दुसरीकडे हा मुलगा नागपूरच्या एका सरकारी निवारागृहाध्ये पोहचला होता. ६ वर्षांपासून त्याचे आयुष्य खूप बदलले होते. एक दिवस सरकारी निवारागृहातील प्रशासनाने त्याचा आधार कार्ड बनविण्याचा निर्णय घेतला..

बंगळूरूमध्ये राहणारा १९ वर्षांचा भरत चिक्कपा (Bharat Chikappa) ना बोलू शकत होता ना ऐकू शकत होता. आजपासून ६ वर्षांपूर्वी १३ वर्षाच्या वयामध्ये मार्च २०१६मध्ये भरतने आपल्या कुटुंबापासून दुरावला होता. आधार कार्डमुळे तो पुन्हा आपल्या आईकडे परत आला आहे. दरम्यान भरतच्या आई त्याला वेड्यासारखी सगळीकडे शोधत होत. दरवाजा वाजला की, त्याच्या आईला वाटत असेल त्यांचा मुलगा भरत परत आला आहे.

सहा वर्ष आपल्या काळजाचा तुकट्याशिवाय, आपल्या मुलाशिवाय या आईने कसे काढले असतील ते फक्त तिलाच माहिती. नागपूर येथील सरकारी सरकारी निवारागृहाध्ये Government Shelter Home)जेव्हा वर्षांनतर माय-लेकराची पुन्हा भेट झाली तेव्हा तो क्षण सर्वांना भावूक करणारा होता.

los
Parenting Tips : या सवयींमुळे तुमच्या मुलाचे बनतील अनेक चाहते

मिळालेल्या माहितीनुसार, भरतची आई बंगळूरीमधील स्थानिक पातळीवरील भाजपची नेता आहे. मार्च २०१६मध्ये आपल्या घरातून २०रुपये घेऊन चॉकलेट खरेदी करण्यासाठी गेला तो परत आलाच नाही. ऑक्टोबर २०१६ला भरत नागपूर स्टेशनवर सापडला. जेव्हा त्याला त्याच्या घराच्या बाबत सांगितले तेव्हा काहीच सांगू शकत नव्हता. या काळामध्ये त्याला तेथून सरकारी निवारागृहातला पाठविण्यात आले. दरम्यानच्या कालवधीमध्ये तो वेगवेगळ्या सरकारी निवारागृहामध्ये पाठवले होते, चार वेगवेगळ्या सरकारी निवारागृहाध्ये तो आतापर्यंत राहिला आहे. मार्च२०१६पर्यंत तो कुठे होता याबाबत तो काहीच सांगू शकत नाही.

los
Office Wear Ideas: ऑफिसमध्ये स्टाईलिश दिसायचंय! या टिप्स लक्षात ठेवा

मुलाच्या शोधामध्ये आईने खर्च केले लाखों रुपये

इकडे आईने आपल्या मुलाला शोधण्यासाठी लाखों रुपये खर्च केले. देवाकडे प्रार्थना केली. पोलिसांनी देखील खूप प्रयत्न केले पण भरतचा कुठेच पत्ता लागू शकला नाही. दुसरीकडे, भरतने नागपूरच्या विशेष शाळेत नववीपर्यंतचे शिक्षण घेतले. डिसेंबर २०२१ मध्ये तो पुन्हा सरकारी निवारागृहात आला. या वर्षी जानेवारीमध्ये भारत केल्टर निवारागृहाचे समुपदेशक महेश रणदीप यांनी आधार कार्ड बनवण्याचा निर्णय घेतला.

los
घर खरेदी करणाऱ्यांना एक एप्रिलपासून झटका! 'ही' कर सवलत मिळणार नाही

आधार कार्ड ठरले नवीन आशा

आधार सेवा केंद्रच्या प्रबंधक कॅप्टन अनिल मराठी यांनी सांगितले की, भरतचे नवीन आधार कार्ड तयार करण्याचा पहिला प्रयत्न ४ फेब्रुवारीला रद्द करण्यात आला. त्यानंतर त्यांनी बंगळूरूमध्ये आधार कार्डच्या तांत्रिक केंद्रासोबत संपर्क साधला, तेव्हा समजले की भरतचे आधार कार्ड कुमार बी नावाने उपलब्ध आहे. त्यानंतर त्याचा एक ओळखपत्र देण्यात आले. या आयडीला मुंबईच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये पाठविण्यात आले. भरतच्या बायोमॅट्रीक्स आयडीसोबत जुळला, आणि त्याचा पत्ता आणि आईची माहिती मिळाली.

६ वर्षांनी आईने मुलाला घेतले कुशीत

७ मार्चला बंगळूरूच्या येलहंका पोलिसांच्या माध्यमातून भरतच्या आईला सूचना दिली होती. पुढच्या दिवशी बंगळूरू पोलिसांसह भरतची आई नागरपूरला पोहचली. आपल्या काळजाच्या तुकड्याला ६ वर्षांनी पाहून खूप भावूक झाली होती. त्यानंतर, पुढच्या दिवशी न्यायलयाच्या आदेशानंतर भरत आपल्या आईसोबत घरी गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()