Sharad Pawar: शरद पवारांची एक भेट अन् अजित पवार गटाचा करेक्ट कार्यक्रम?

शरद पवार यांची आजीवन दोस्ती: अजित पवार गटाच्या कर्यक्रमात एक भेट
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर एकेकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक म्हणून राहिलेले नगरसेवक नजीब मुल्ला हे अजित पवार गटात सामील झाले. त्यानंतर मुल्ला यांनी आव्हाड यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील आव्हाड यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

त्यातच रविवारी शरद पवार हे कल्याणच्या दौऱ्यावर असताना त्यांनी थेट मुल्ला यांच्या राबोडी परिसराला भेट देत, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांना निवासस्थानी भेट दिली. या भेटीमुळे जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar Video: शरद पवारांचे पुन्हा पावसात भाषण... म्हणाले, "संघर्ष करु अन् धैर्याने पुढे जाऊ"

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारी कल्याण, नवी मुंबई दौऱ्यावर होते. कल्याणला जाताना त्याचे आनंद नगर चेक नाक्यावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर पवार यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या निवासस्थानी भेट दिली.

राबोडी या भागात अनेक वर्षांपासून नजीब मुल्ला आणि सुहास देसाई हे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात फारसे सख्य नसल्याचे दिसून आले. त्यानंतर मुल्ला यांनी आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठवत कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील आव्हाड यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar यांनी इतिहास सांगितला तरी, Ajit Pawar गटाकडे २ पॉवरफुल्ल मुद्दे | NCP Crisis

त्यातच कळवा-मुंब्रा शहरातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यांना शिंदे गटात आणण्यात मुल्ला यांचा मोठा वाटा असल्याची चर्चादेखील त्या वेळी रंगली होती. अशातच आव्हाड यांनी शरद पवार यांनाच थेट मुल्ला यांच्या बालेकिल्ला असलेल्या राबोडीत आणले. या भेटीमुळे जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.


भाजप शहर उपाध्यक्ष देसाई यांच्या भेटीला?


शरद पवार हे राबोडी भागात येणार असल्याचे कळताच भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष विक्रम भोईर हेदेखील सुहास देसाई यांच्या निवासस्थानी आले होते. या ठिकाणी गर्दी असल्याने त्यांना पवार यांची भेट घेता आली नाही. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांना पाहण्यासाठी आल्याचे विक्रम भोईर यांनी या वेळी सांगितले.

Sharad Pawar
Sharad Pawar: पक्षफुटीनंतर प्रथमच शरद पवार येणार नवी मुंबईत; कोण असणार टार्गेट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()