सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार! 8 नराधमांना जन्मठेप तर तिघांना 20 वर्षांचा कारावास; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अल्पवयीन पीडितेशी ओळख करून तब्बल ११ जणांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केले. तब्बल पाच महिने तिच्यासोबत असा प्रकार सुरू होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी या प्रकरणातील आठ नराधमांना दुहेरी जन्मठेप तर तिघांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
court
Courtesakal
Updated on

सोलापूर : शहरातील एका शैक्षणिक संस्थेत शिकत असलेल्या अल्पवयीन पीडितेशी ओळख करून तब्बल ११ जणांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केले. तब्बल पाच महिने तिच्यासोबत असा प्रकार सुरू होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी या प्रकरणातील आठ नराधमांना दुहेरी जन्मठेप तर तिघांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये पीडिता तिच्या घरातून त्या शिक्षण संस्थेत रिक्षातून जात होती. दीड महिन्यापूर्वी तिची ओळख आरोपी सचिन श्रीकांत राठोड (वय २४) याच्यासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून शहराबाहेरील लॉजवर अत्याचार केला. त्यानंतर तिला रंगभवन येथे सोडले. त्याचवेळी राज ऊर्फ राजकुमार सिद्राम देसाई (वय २३) याने तिला रिक्षात बसवून नेले आणि एका मैदानावर अत्याचार केला. त्याच दिवशी पीडिता सायंकाळी पाचच्या सुमारास घराबाहेर पडली, त्यावेळी प्रवीण श्रीकांत राठोड (वय २४) याने रिक्षात बसवून शहराबाहेरील लॉजवर नेले आणि अत्याचार केला. काही दिवसांनी प्रवीणचा मित्र आनंद ऊर्फ राजवीर राम राठोड याने प्रवीणसोबत तिच्यावर अत्याचार केले. एकेदिवशी पीडितेने मैत्रीण पार्वती राठोड हिच्या भावाची शायरीची वही राजवीरला दिली. त्याने ती वही प्रवीणला दिली. त्यानंतर आरोपी अक्षय ऊर्फ गणेश विष्णू चव्हाण (वय २२) व सतीश अशोक जाधव (वय ३०) यांनी पीडितेला शायरीची वही द्यायचे सांगून रिक्षातून शहराबाहेरील जंगलात नेले. त्या ठिकाणी प्रवीणला बोलावून घेतले आणि तिघांनी आळीपाळीने अत्याचार केले. काही दिवसांनी प्रवीणने पीडितेला कॉलेजकडे नेले. तेथे मित्र अक्षय व रोहित श्‍याम राठोड हे कार घेऊन थांबले होते. त्यांनी पीडितेवर कारमध्येच अत्याचार केले.

एकेदिवशी कॉलेजवरून घरी जात असताना रोहित व मित्र टिकटॉक किंग दिनेश परशू राठोड (वय १९) आणि चेतन राम राठोड यांनीही कारमध्येच सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी पीडितेची ओळख गौरव विलास भोसले (वय ३०, रा. निराळे वस्ती) यानेही लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने अत्याचार केला. या अत्याचाराला वैतागून पीडिता एका मंदिराजवळ आत्महत्येचा विचार करत रडत बसली होती. त्यावेळी एका सामाजिक कार्यकर्त्याने पीडितेसोबतचा प्रकार जाणून घेतला व तिच्यावरील अन्याय उजेडात आला. विजापूर नाका पोलिसांत ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्यांना मंगळवारी (ता. ५) न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

जिल्हा सरकारी वकिलांचा दमदार युक्तिवाद अन्‌ आरोपींना शिक्षा

अल्पवयीन मागासवर्गीय पीडितेवरील अत्याचार प्रकरणात जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी पीडितेच्या वतीने बाजू मांडताना ३८ साक्षीदार तपासले. सात घटनास्थळांना भेटी देऊन पाहणी केली. पोलिसांनी आठ दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सर्व साक्षी-पुराव्यांच्या आधारे ॲड. राजपूत यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून आठ जणांना जन्मठेप तर तिघांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त प्रीती टिपरे यांनी गुन्ह्याचा तपास केला. पोलिस हवालदार दीपक चव्हाण यांनीही त्यासाठी मदत केली होती. कोर्टपैरवी म्हणून पोलिस हवालदार सुनंदा घाडगे यांनी काम पाहिले.

‘या’ आरोपींना शिक्षा

अल्पवयीन मागासवर्गीय पीडितेवरील अत्याचार प्रकरणात प्रवीण राठोड, गणेश ऊर्फ अक्षय चव्हाण, आनंद ऊर्फ राजवीर राठोड, श्रीकांत राठोड, रोहित राठोड, दिनेश राठोड, चेतन राठोड, करण भरले, सतीश जाधव या आठ जणांना दुहेरी जन्मठेप तर राज ऊर्फ राजकुमार देसाई, सचिन राठोड व गौरव भोसले या तिघांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी ठोठावली. या गुन्ह्यात जिल्हा सरकारी वकिलांचा युक्तिवाद व साक्षीदारांची साक्ष, पुरावे महत्त्वाचे ठरले. जिल्हा सरकारी वकील ॲड. राजपूत यांच्या कार्यकाळातील ही १०९ जन्मठेप ठरली आहे. त्यांच्या युक्तिवादामुळे न्यायालयाने १०९ आरोपींना जन्मठेप ठोठावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.