मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी मुंबईत दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावणार?

सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यांनतर आज मुख्यमंत्री अधिवेशनात याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.
maratha reservation
maratha reservationsakal
Updated on

मुंबई- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यांनतर आज मुख्यमंत्री अधिवेशनात याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ( A two-day special adiveshan in Mumbai for Maratha reservation issue)

शिंदे समितीने आपला दुसरा अहवाल शिंदे सरकारकडे सोमवारी सादर केला आहे. मात्र, राज्य मागासवर्ग आयोगाने अद्याप आपला अहवाल सादर केला नाही. अहवाल सादर केल्यानंतर सरकार पुढचा निर्णय घेऊ शकते. याबाबत आज मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी बंगल्यावर बैठक बोलावली आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत. मराठा आरक्षणाबाबत अजित पवार आज अधिवेशनात बोलणार असल्याची देखील माहिती आहे. विशेष अधिवेशनाबाबत आज सभागृहात माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे सरकार आता सक्रीय झाल्याचं दिसतंय.

maratha reservation
Maratha Reservation : दिल्लीतील सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपली, मराठा आरक्षणासंबंधी दोन महत्त्वाचे ठराव

सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रामगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात महत्त्वाची चर्चा झाल्याचं बोललं जातं. दरम्यान, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. याबाबत २३ डिसेंबरला पुढील रणनीती ठरवणार असल्याचं जरांगे म्हणाले. (Latest Marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()