Kolhapur: चंद्रकांत पाटलांसमोर तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर हा प्रकार घडला
Kolhapur: चंद्रकांत पाटलांसमोर तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न
Updated on

अणुकंपाच काम रखडल्यामुळं कोल्हापूरात तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्या समोर या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर हा सर्व प्रकार घडला आहे. धरणगुत्ती इथल्या संतोष राजू कांबळे या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अणुकंपाच काम होत नव्हंत म्हणून त्याने हे पाऊल उचलल आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हा प्रकार घडला आहे. या व्यक्तीला पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. 2007 वर्षापासून हे काम होत नसल्यामुंळ हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये अनुकंपा खाली भाऊजींना नोकरीस घेत नसल्याच्या कारणावरून आज संतोष राजू कांबळे (रा. दानोळी, ता. शिरोळ) याने जिल्हा अधिकारी यांच्या दलना बाहेरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे सुद्धा तेथे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या दालना बाहेर असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी राजू भालचिम आणि दिलीप वडर यांनी संतोष च्या हातातील रॉकेलची बाटली काढून घेतल्यामुळे हा अनर्थ टळला. पोलीस उपनिरीक्षक गजानन परीट यांनी तातडीने संतोषला पकडून तेथून बाहेर आणले. शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती श्री परीट यांनी दिली.

दरम्यान 2007 सालापासून भाऊजी परशुराम कांबळे यांना अनुकंपा खाली नोकरी न दिल्याने तसेच अधिकारी भेटत नसल्याने हे कृत्य केले असल्याची माहिती परशुराम कांबळे आणि संतोष कांबळे यांनी पोलिसांना दिली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या दालना बाहेरच हा प्रकार घडल्यामुळे परिसरात रॉकेलचा वास होता. कर्मचारींनी तातडीने रॉकेल पुसून काढले तर जिल्हाधिकारी यांनी पुढील बैठक सुरू ठेवली.

मंत्री चंद्रकांत पाटील आणि घाटगे हे दोघेही जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कागल मध्ये झोपडपट्टीवाशी यांच्या प्रश्न वरील बैठकीसाठी आले होते. बैठक संपवून ते बाहेर येत असतानाच तेथे कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरला. याचवेळी मंत्री चंद्रकांत पाटील, घाटगे आणि जिल्हाधिकारी दालनाच्या बाहेर आले होते, हा सर्व प्रकार सुरू असताना मंत्री तेथून निघून गेले असे घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.