Aditya Thackeray latest marathi news मुंबई : बंडखोर गटावर हल्ला तीव्र करीत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देशद्रोही संबोधले. यानंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना युवराज म्हणत ठाकरे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला लक्ष्य न करण्याचा संकल्प मोडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाच्या आमदारांना वाटते की, आदित्य ठाकरेंनी सीमा ओलांडली आहे. त्यांच्याविरुद्ध खोटे पसरवत आहेत. ज्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे.
शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची खिल्ली उडवली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून त्यांच्या विरोधात बॅनर लावले होते. ज्यावर युवराजांची दिशा चुकली असे लिहिले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव आणि आदित्य यांना लक्ष्य करीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे निष्ठावंतांनी बुधवारी असाच निषेध केला होता. त्यांनी शिवसेना नियंत्रित बृहन्मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे बॅनर दाखवले होते.
शिंदे (Eknath Shinde) गटाने ठाकरे पिता-पुत्राच्या पाठिंब्याने बीएमसीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करीत घोषणाबाजी केली. जूनमध्ये शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड केल्यानंतर आमदारांनी ठाकरे पिता-पुत्र जोडीवर निशाणा साधण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. आदित्य ठाकरे काही दिवसांपासून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांना भेटी देत आहे तसेच देशद्रोही म्हणत आहे.
आदित्य ठाकरे आम्हाला देशद्रोही म्हणतो. परंतु, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून हिंदुत्त्वाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांच्याकडून हे आरोप कधीपर्यंत ऐकणार, असे मुंबईतील (Mumbai) माहीमचे आमदार आणि शिवसेनेच्या बंडखोर गटाचे सदस्य सदा सरवणकर म्हणाले. शिवसेनेचे दुसरे बंडखोर आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी पसरवलेल्या खोट्या गोष्टींचा सामना करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करणे आवश्यक होते.
ठाकरे आडनाव त्यांच्याशी जोडले गेल्याने आतापर्यंत आम्ही गप्प होतो. परंतु, आता तुम्ही आमच्यावर हल्ला केलात तर आम्ही गप्प बसणार नाही, असे शिवसेनेचे दुसरे बंडखोर आमदार योगेश कदम म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.