महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनंतर आता राज्यात कोरोना साथीची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी लोकांना घाबरू नका असे आवाहन केले. ते म्हणाले की, राज्यात कोरोना महामारीची चौथी लाट दिसू शकते, तसेच राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत. (aaditya thackeray say state maybe seeing 4th covid wave masks will soon become mandatory)
आदित्य ठाकरे म्हणाले, 'आम्ही प्रत्येकाला घराबाहेर पडताना मास्क घालण्यास सांगत आहोत. आम्ही मास्क घालणे बंधनकारक केलेले नाही, पण लवकरच त्याची अंमलबजावणी करू. मी जनतेला लसीचा बूस्टर डोस वेळेवर घेण्याचे आवाहन करतो. गेल्या काही आठवड्यांत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाचे 1000 हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.
एक दिवसापूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते की, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अद्याप बंधनकारक नाही, परंतु वाढलेल्या कोरोनाच्या भागात लोकांनी मास्क घालण्याचे आवाहन केले होते. राज्याच्या कोविड टास्क फोर्सने नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी तसेच बस, ट्रेन, शाळांमध्ये मास्क वापरण्याचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला.
शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची 1,357 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एका दिवसापूर्वी, राज्यात संसर्गाची 1,134 प्रकरणे नोंदवली गेली आणि तीन रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात आज सलग तिसऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.