Aarakshan Bachav Janyatra: वंचित काढणार 'आरक्षण बचाव जनयात्रा'; प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी घोषणा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा काढण्यात येणार असल्यानं वंचितच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkaresakal
Updated on

मुंबई : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरुन संघर्ष पेटलेला असताना त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा केली आहे. त्यानुसार, १३ जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून छत्रपती संभाजीनगर इथं या यात्रेची सांगता होणार आहे. पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी याची माहिती दिली.

Prakash Ambedkar
Pansare Murder Case: मोठी घडामोड! डॉ. वीरेंद्र तावडेला पुन्हा अटक! कॉ. पानसरे खूनप्रकरणी कोर्टाकडून जामीन रद्द

आंबेडकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी २६ जुलै रोजी सामाजिक आरक्षणाला सुरुवात केली होती. त्याअनुषंगानं शाहू महाराजांना स्मरण करुन येत्या २६ जुलै रोजी पासून वंचित बहुजन आघाडीकडून एससी-एसटी, ओबीसी यांच्या आरक्षण बचावची हक्काची लढाई आम्ही सुरु करणार आहोत. मुंबईतल्या चैत्यभूमीवरुन या 'आरक्षण बचाव जनयात्रे'ला सुरुवात होणार आहे.

Prakash Ambedkar
NCP Supreme Court: राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळाचं काय होणार? अजित पवारांकडून सुप्रीम कोर्टानं मागितलं उत्तर

'या' जिल्ह्यांतून निघणार यात्रा

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना अशी ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे. या यात्रेची सांगता ७ किंवा ८ ऑगस्टला औरंगाबादमध्ये होईल, असंही यावेळी आंबेडकर यांनी सांगितलं.

Prakash Ambedkar
Pooja Khedkar: "....मीच पोलिसांना बोलावलं होतं"; IAS पूजा खेडकर असं का म्हणाल्या? जाणून घ्या

कसा असणार कार्यक्रम?

यात्रेवेळी ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या जातील. तसंच मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील. यामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे. एसी, एसटी समाजाची स्कॉलरशीप डबल झाली पाहिजे. केंद्रातील स्कॉलरशीपमध्ये राज्य स्वतः चा हिस्सा देत नाही. तसंच ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशीप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com