AARTI: बार्टीच्या धर्तीवर आर्टी! मांतग समाजासह उपजातींच्या विकासासाठी नवी संस्था

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
ANNA BHAU SATHE
ANNA BHAU SATHESakal Digital
Updated on

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याद्वारे मातंग समाजासह इतर यातील उपजातींच्या सामाजिक विकासासाठी ही संस्था काम करणार आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. (AARTI form based on BARTI news organisation for social development of Mantag community in Maharashtra)

ANNA BHAU SATHE
Captain Brijesh Thapa : ''आर्मी डे'ला झाला होता जन्म अन् आर्मीसाठी दिलं समर्पण'', जाणून घ्या शहीद कॅप्टन बृजेश थापाची स्टोरी

शासनानं परिपत्रकात काय म्हटलंय?

शासनानं आर्टीच्या स्थापनेबाबत काढलेल्या परिपत्रकात म्हटलंय की, अनुसुचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतीक आणि राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व अनुसुचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग सामाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना करण्यात आली होती.

या आयोगानं ८२ शिफारशी केल्या होत्या. त्यांपैकी मातंग समाजाच्या विकासासाठी संस्था स्थापन करण्याची एक शिफारस होती. त्यानुसार बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्याबाबत नुकत्याच पार पडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, मंत्रीमंडळानं याला मंजुरी दिली.

ANNA BHAU SATHE
कर्नाटक सरकारने केलं, महाराष्ट्र करणार का? खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100 टक्के आरक्षण

'या' उपजातींसाठी होणार काम

आर्टीकडून मातंग समाजासह मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा या समाजाच्या विकासासाठी आर्टी ही नवी संस्था काम करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.