Aashadhi Ekadashi : यंदा आषाढी एकादशीला 40 टक्के वारकऱ्यांनी फिरवली पाठ; 10 ते 12 लाख भाविकांची हजेरी

Pandharpur Math dispute in police
Pandharpur Math dispute in policeSakal
Updated on

पंढरपूर : यंदाच्या पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून आणि परराज्यातूनही वारकरी भाविक येत असतात. प्रत्येक वर्षी १५ ते २० लाख भाविकांची मांदियाळी पंढरपुरात दाखल होत असते. पण यावर्षी तब्बल ४० टक्के भाविकांनी पंढरपुराकडे पाठ फिरवल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.

आषाढी एकादशीला दर्शन रांग ही रांजणी रोडवरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत म्हणजेच आठ ते नऊ किलोमीटर लांबपर्यंत जात असते पण या वर्षी दर्शन रांग दहा पत्रा शेड पैकी आठ पत्रा शेडपर्यंतच आहे. यंदा प्रशासनाने १८ ते २० लाख भाविक येतील या हेतूने तयारी केली होती पण यावर्षी फक्त १० ते १२ लाख भाविक आल्याची माहिती असून तब्बल ४० टक्के भाविकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

Pandharpur Math dispute in police
मोठी बातमी! 'छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही'; राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी | Chh. Sambhajinagar

आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन रांग पूर्ण भरलेली असते पण यावर्षी ही रांग मोकळी असून चंद्रभागेचे पात्र आणि प्रदक्षिणा मार्ग येथेच भाविकांची गर्दी असल्याचं समोर आलं आहे. तर इतर ठिकाणी भाविकांची गर्दी नसल्याचं चित्र आहे. यावर्षी सुमारे आठ लाख भाविक कमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, यावर्षी अधिक मास असल्यामुळे आषाढी एकादशी लवकर आली, त्याचबरोबर पावसाने दडी मारल्यामुळे शेतीतील पेरण्या, लागवडी अशी कामे खोळंबली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीच्या कामामुळे वारीला आली नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.