Abdul Sattar News : दिपक गवळी कोण? खंडणी प्रकरणावर कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सारवासारव

Abdul Sattar
Abdul Sattar Sakal
Updated on

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. आता हा प्रकार चांगलाच वादात सापडला असून या पथकात कृषिमंत्र्यांचे स्वीय सहायक यांच्यासह काही खाजगी व्यक्ती असल्याचा देखील आरोप होत आहे.

तसेच या पथकाकडून पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाकडून करण्यात आला. धाडी टाकणाऱ्या या पथकामध्ये असलेले दिपक गवळी हे कृषिमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक (पीए) असल्याचा आरोप करण्यात आला.

मात्र सत्तारांनी हा आरोप फेटाळून लावला. यानंतर दिपक गवळी नेमके कोण? असा सवाल विचारण्यात येत होता. दरम्यान या प्रकरणाबद्दल आता कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Abdul Sattar
Wari 2023 : फडणवीसांचा दावा खोटा? पोलिसांनी एकांतात नेऊन मारलं, जळगावच्या विद्यार्थी-वारकऱ्याचा Video Viral

सत्तार म्हणाले की, दिपक गवळी कृषी अधिकारी आहे आणि तो त्याचा या युनिटमध्ये समावेश आहे. ६२ अधिकाऱ्यांनी कारवाई केली. ५० वर्षांमधील ही पहिली कारवाई आहे. आतापर्यंत २६९ कारवाया झाल्या आहेत. या कारवाईमध्ये ६२ लोक संपूर्ण महाराष्ट्रातून नेमले होते, यापैकी दिपक गवळी देखील एक होते, असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिलं.

तसेच कोणी पैशाची मागणी केली असेल तर त्यांच्याविरोधात कारवाई करा असं अकोल्याच्या सभेत मीच बोललो आहे असेही सत्तार यावेळी म्हणाले.

Abdul Sattar
Accident on Samruddhi Mahamarg : रस्ता की मृत्यूचा सापळा? पुन्हा भरवीर-शिर्डी समृद्धी महामार्गावर अपघात; चौघे ठार

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात लवकरच नवा कायदा…

पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, बोगस औषध, बियाणे कंपन्यांनी ताबडतोब नष्ट करावं. कारण यासाठी आता महसूल विभाग, कृषीविभाग आणि पोलिस या तिंघांना मिळून पथक तयार करण्यात येणार आहे. तसेच फक्त दीपक गवळीच का, कोणत्याही शेतकऱ्याने तक्रार केली तर त्याची ओपन चौकशी त्याच्यासमोरच केली जाईल. लपवून छपवून काम झालं नाही. हे काम मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर करण्यात आलं असंही सत्तारांनी यावेळी सांगितलं.

तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नवीन कायदा करण्यात येईल. ज्यामध्ये बोगस बियाणे आणि खते देणाऱ्यांना दहा वर्ष शिक्षा व्हायला पाहिजे आणि यांची बेल झाली नाही पाहिजे असेही सत्तार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.