Abdul Sattar: 'तो' एक शब्द, अब्दुल सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम होणार?

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यानं आता राज्यभरात वेगळ्या प्रकारचे वातावरण दिसून आले आहे.
Abdul Sattar and supriya sule
Abdul Sattar and supriya suleesakal
Updated on

Abdul Sattar state minister comment: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यानं आता राज्यभरात वेगळ्या प्रकारचे वातावरण दिसून आले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर सत्तार यांच्या घरावर हल्ला केला आहे. काही करुन त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. अशातच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सत्तार यांचे समर्थनही केले नाही आणि त्यांना चुकीचेही म्हटले नाही. अशी नरो वा कुंजरो वा धर्तीवर दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.

सत्तार यांना ते वक्तव्य भोवणार की त्याचे आणखी काय परिणाम होणार याविषयी सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. सत्तार यांनी प्रतिक्रिया देताना पातळी सोडली आणि ते जे नाही ते बोलून गेले, असे त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर सत्तार यांचे ते वक्तव्य चुकीचेच आहे. मात्र अभिनेत्री कंगनावर जेव्हा शिवसेनेच्या संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली होती त्याचा उल्लेख वाघ यांनी यावेळी केला. यासगळ्यात खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत आहे. त्यांच्या प्रतिक्रियेची चर्चा होती. मला सत्तार यांच्या प्रतिक्रियेवर काहीच बोलायचे नाही. असे सुळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

सोशल मीडियावर मात्र सत्तार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. त्यांच्यावर मीम्सही व्हायरल झाले आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सत्तार यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. सत्तार यांना आगामी काळामध्ये मोठ्या राजकीय धक्क्याला सामोरं जावं लागणार की काय अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे सत्तार आणखी चर्चेत आले आहे.

Abdul Sattar and supriya sule
Abdul Sattar on Supriya Sule : सुप्रिया सुळेंबद्दल $#@$#@ सत्तार काय बोलून गेले?

पन्नास खोक्यांचा आरोप काय झाला तर कुणीच काही बोलले नाही, त्यावरुन काय समजायचे? असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. त्यावर सत्तारांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं आता राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र ते वक्तव्य करताना त्यांची जीभ घसरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सत्तार हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. दुसरी बाब म्हणजे सत्तार यांनी आपल्याला काही फरक पडलेला नाही. असं म्हणून आपल्या बोलण्याचे समर्थन केले आहे,

Abdul Sattar and supriya sule
Abdul Sattar: खोक्याच्या टीकेवरुन सत्तारांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंना शिवीगाळ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.