Maharashtra Politics: बीआरएसच्या एंट्रीमुळे अभिजीत पाटलांचा राष्ट्रवादीकडून लढण्याचा मार्ग मोकळा पण...

राष्ट्रवादीकडून लढण्याचा अभिजित पाटलांचा मार्ग मोकळा
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे, विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पंढरपुरात तिरंगी लढत अटळ मानली जात असतानाच भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे कोणती भूमिका घेणार? याकडेच आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Marathi Tajya Batmya)

पंढरपूरमध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुळवड सुरू आहे. कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने भालके-काळे आणि युवराज पाटील हे पुन्हा एकत्रित आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भालकेंसाठी जमेची बाजू आहे. मागील काही दिवसापूर्वी भगीरथ भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे एक वर्ष आधीच तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. (Latest Marathi News)

विठ्ठल साखर कारखान्यावरील सत्तांतरानंतर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अगदी जवळ गेले आहेत. तर भगीरथ भालके हे मात्र त्यांच्यापासून काहीसे दुरावले आहेत. अलीकडेच विठ्ठल साखर कारखान्यावरील कार्यक्रमात शरद पवार यांनी अभिजित पाटील यांचे नेतृत्व लोकांनी तयार केले आहे.

या नेतृत्वाला पाठिंबा देण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे सूचक वक्तव्यही केले होते. त्यानंतर भालके व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कारखाना निवडणुकीपूर्वी मुद्दामहून आपणास अडचणीत आणले, असा थेट आरोप केला आहे.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Mumbai Murder Case: क्रूरतेचा कळस! सरस्वतीचे शरीराचे 20 तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले अन्...

२०२० मध्ये झालेल्या पोटनिव़डणुकीत भगीरथ भालके यांना तब्बल एक लाख पाच हजार इतकी मते मिळाली होती. त्यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे मतदार संघात आजही भालके यांच्या विषयी सहानभूती असल्याचे दिसते. त्याच जोरावर भालकेंनी विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. भालके हे राष्ट्रवादीत नाराज असल्याचे समजताच भारत राष्ट्र समितीच्या नेते भालकेंच्या सातत्याने संपर्कात आहेत.(Marathi Tajya Batmya)

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भालकेंना आपल्या बीएसआर पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार भालकेंनी बुधवारी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची हैदराबाद येथे जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान बीएसआर पक्ष प्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती आहे. यामध्ये माजी आमदार केशव धोंडगे यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Loksabha Election: ८२ वर्षांचे माजी मुख्यमंत्री पुन्हा अॅक्टीव्ह! लोकसभेत काँग्रेसची व्होट बँक वाढणार का?

लवकरच भालके आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Marathi Tajya Batmya)

राष्ट्रवादीनेही मतदारसंघात जोरदार तयारी सुरु केली आहे. भालकेंसोबत असलेल्या कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. भालके गेले तरी कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीसोबत राहतील, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Balu Dhanorkar: बाळू धानोरकरांच्या जागी कोण लढणार? काँग्रेसमधून 7 नेत्यांची नावे चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()