दिल्लीच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईत खलबतं! ममतांचा भाचा ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर

Abhijit Banerjee: एका सूत्राने सांगितले की, टीएमसीचे सरचिटणीस आणि सपा प्रमुख दोघेही पुढे जाण्याच्या मार्गावर पूर्णपणे सहमत आहेत.
Abhijit Banerjee
Abhijit BanerjeeEsakal
Updated on

ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत. या भेटीत इंडिया आघाडीच्या सत्ता स्थापनेबाबत खलबतं होण्याची शक्यता आहे.

दरम्यान तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी काल दिल्ली येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ते मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आल्याने राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सकाळी अखिलेश यादव यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. एका सूत्राने सांगितले की, टीएमसीचे सरचिटणीस आणि सपा प्रमुख दोघेही पुढे जाण्याच्या मार्गावर पूर्णपणे सहमत आहेत.

त्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. या बैठकीत काय चर्चा झाली यावर भाष्य न करता ओब्रायन म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारला जनतेने नाकारले आहे. ते म्हणाले, मोदींच्या भाजपने भारतावर दहा वर्षे राज्य केले. जनतेने त्यांना आणि त्यांच्या सरकारला नाकारले आहे. ही फक्त सुरुवात आहे.

दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष अल्पमतात आहे, पण तरीही ते सरकार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खिचडी शिजवत आहेत. पण ते नीट शिजवणार नाहीत आणि त्यामुळे देशाचे नुकसान होईल, असा आम्हाला संशय आहे. यामुळे राजकीय अस्थिरता राहील. अशा गोष्टींमुळे देशाला धोका निर्माण होतो.

यानिवडणुकीत एकट्या भाजपने 240 जागा जिंकल्या. दुसरीकडे, विरोधी आघाडीने 233 जागा जिंकल्या, त्यापैकी 99 जागा काँग्रेसच्या आहेत. महाराष्ट्रात नऊ जागा जिंकणारी शिवसेना (UBT) आणि पश्चिम बंगालमध्ये 29 जागा जिंकणारी TMC हे दोन्ही विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा भाग आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.