Loksabha Election News : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या तयारीला वेग आला आहे. पाटण्यानंतर आता विरोधी पक्षांची पुढील बैठक आज आणि उद्या (१७ आणि १८ जुलै) रोजी होणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे काँग्रेसने बोलावलेली ही दुसरी विरोधी पक्षांची एकता बैठक आहे. (Latest Marathi News)
या बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहीती आहे. या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट टू मिनिटाचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला असून, त्यामुळे या बैठकीत तरी विरोधी एकजुटीच्या दिशेनं विरोधक ठोस निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर मागच्या वेळी शरद पवार यांच्यासह राज्यातील इतर नेतेही उपस्थित होते. तर आजच्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. शरद पवारांनी अचानक कार्यक्रम रद्द केला आहे. तर आज शरद पवार मुंबईत थांबणार आहेत.
या बैठकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे, आजवर विरोधी एकजुटीचे सर्वात मोठे नेते म्हणून पाहिले जाणारे शरद पवार यांच्याच पक्षात बंड झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत, तर त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.(Latest Marathi News)
अशातच आज विरोधकांच्या बैठकीचा भाग असलेल्या बंगळुरूतील डिनरला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच, टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या डिनरपासून आधीच स्वतःला दूर केलं आहे. मात्र, 18 जुलै रोजी होणाऱ्या चर्चेत ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत. शरद पवार 17 जुलै रोजी मुंबईत आपल्या आमदारांची भेट घेणार आहेत.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.