'छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ओवैसी आहेत.'
Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (NCP leader Chhagan Bhujbal) यांनी सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.
दरम्यान, आता या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र, आपल्या सरस्वती विरोधी भूमिकेवर ठाम राहिल्यावरून भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केलीय. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ओवैसी आहेत. त्यांनी अशी भूमिका मांडून तमाम हिंदूंचा अपमान केला आहे, असं त्यांनी म्हटलंय.
भोसले म्हणाले, राज्यात हिंदुत्ववादी (Hindu) सरकार आल्यामुळं विषारी गरळ ओकून हिंदुंमध्ये गोंधळ निर्माण करायचा आणि दंगली भडकवायच्या असा त्यांचा कट आहे. माफी न मागून आपल्या हिंदुविरोधी भूमिकेवर ठाम राहणाऱ्या शरद पवार यांच्या या हस्तकाला पुन्हा एकदा अंडा सेल दाखवण्याची आता वेळ आलीय, अशा शब्दांत आचार्य भोसलेंनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
समता परिषदेच्या कार्यक्रमात मी केवळ माझं मत मांडलं होतं. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. ज्योतीबा फुलेंनी स्थापन केलेला सत्यसोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण होणार असल्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम होता. यावेळी बोलताना, आपण शाळेत पहिल्या दिवशी सरस्वतीची पूजा करतो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), ज्योतीबा फुले, अण्णसाहेब कर्वे आदी महापुरूषांची पूजा करत नाही. ते आपले देव आहेत. त्यांची पूजा आपण का करत नाही. या लोकांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली. यावेळी त्यांना विरोध सहन करावा लागला. अशा परिस्थिती ज्यांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडी केली त्यांची पूजा करायची सोडून आपण सरस्वती देवीची पूजा करतो. त्यामुळं देवीच्या जागी महापुरुषांची पूजा करावी एवढं माझ्या म्हणण्याचा उद्देश होता, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.