Atul Kulkarni Reel: "मारलं की मरायचं असतं"; अभिनेता अतुल कुलकर्णीचं अस्वस्थ करणारं रील

महात्मा गांधी सध्या राज्यभरात चर्चेत आहेत, याचं कारण आहेत संभाजी भिडे
Atul Kulkarni_Mahatma Gandhi
Atul Kulkarni_Mahatma Gandhi
Updated on

मुंबई : राज्यभरात सध्या राष्ट्रपिता महात्मा गांधी चर्चेत आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं संताप व्यक्त होत आहे. यावरुन सामान्य नागरिक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार मंडळी सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागले आहेत. अभिनेता आणि लेखक अतुल कुलकर्णी 'रील' सारख्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. अस्वस्थ करणारं त्याच्या रीलची सगळीकडं चर्चा आहे. (Indian Navy ends colonial legacy of carrying batons with immediate effect)

Atul Kulkarni_Mahatma Gandhi
Manipur: मणिपूरच्या हिंसाचारात चीनचा हात? माजी लष्करप्रमुख नरवणेंनी सरकारकडून व्यक्त केली अपेक्षा

काय आहे रीलमध्ये?

सध्याच्या संभाजी भिडेंच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अतुल कुलकर्णीनं आपली भूमिका मांडली आहे. काही काव्य पंक्तींच्या माध्यमातून त्यानं महात्मा गांधींची हत्या झाली तरी ते आपल्यातून गेलेले नाहीत. त्यांची विविध प्रकारे अजूनही बऱ्या-वाईट प्रकारे लोकांना आठवण येते, असं त्यांनी यातून अधोरेखित केलं आहे.

गांधी एक अशी व्यक्ती आहे, ज्यांना वारंवार शाब्दिक गोळ्या घालून मारलं जातं पण गांधी मरतानाही थकत नाहीत. बदनाम करण्याचा प्रयत्न करुनही ते विरोधकांना पुरुन उरतात. नोटांवरुनही आता गांधींनी जाऊन बघावं देशातील जनतेची प्रतिक्रिया कशी असेल? याचं एक काल्पनिक चित्र अतुल कुलकर्णी यांनी उभं केलं आहे.

अहिंसेचा संदेश माणणाऱ्यांच्या व्यथा कदाचित अशाच प्रकारे बाहेर येतात. म्हणून त्यानं मांडलेलं सर्वकाही अत्यंत अस्वस्थ करणार आहे.

Atul Kulkarni_Mahatma Gandhi
Colonial Legacy Ends: 'अमृत काला'त इंडियन नेव्हीची 'ही' प्रथा होणार बंद; वसाहतवादाचा आणखी एक वारसा संपला

रीलमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहा?

तू मर बुवा एकदाचा असं नसतं करायचं! मारलं की मरायचं !!

गोळ्या किती महाग असतात दरवर्षी घ्याव्या लागतात.

तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन? बाप्पू....

असं नसतं करायचं, मारलं की मरायचं !

एकदा मारुन मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस

बदनाम करुनही बधत नाहीस, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं.

मारलं की निमुट मरायचं असतं !!

तू ना... एक संधी देऊन तर बघ, नोटांवरुन जाऊन तर बघ

ती सबकी सन्मती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो

जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं

मारलं की निमूट मरायचं असतं...पुढच्या वर्षी नक्की मरं !!!

- अतुल कुलकर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.