Govinda Joins Shivsena : ''माझा चौदा वर्षांचा वनवास संपला, रामराज्य...'', शिवसेना प्रवेशानंतर गोविंदा नेमकं काय म्हणाले?

Govinda Arun Ahuja Joins Shivsena : शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. कुठल्याही अपेक्षांशिवाय गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
Govinda Arun Ahuja Joins Shivsena
Govinda Arun Ahuja Joins Shivsenaesakal
Updated on

Govinda Arun Ahuja Joins Shivsena : शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. कुठल्याही अपेक्षांशिवाय गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

प्रवेशानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, अभिनेता गोविंदा यांचं मी शिवसेनेत स्वागत करतो. डाऊन टू अर्थ असणारे लोकप्रिय अभिनेता गोविंदा आहेत. त्यांच्या प्रतिमेचा पक्षाला फायदा होईल.

प्रवेशानंतर गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. त्यानी म्हटलं की, मी आज पक्षात प्रवेश करतोय, कारण देवापासून मिळालेली ही प्रेरणा आहे. राजकारणातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं होतं की, मी पुन्हा या दिशेला दिसणार नाही.. मात्र १४ वर्षांच्या वनवासानंतर मी शिवसेनेत.. राम राज्यात आलोय. मला दिलेली जबाबदारी मी इमानदारीने पार पाडीन, असा विश्वास गोविंदांनी बोलून दाखवला.

Govinda Arun Ahuja Joins Shivsena
Rohit Pawar : बारामतीबरोबर राज्यातही भाजपाला पराभव स्वीकारावा लागेल - आमदार रोहित पवार

गोविंदा यानं पुढे म्हटलं की, मला कलेसाठी काम करायला आवडेल, मी फार वर्षापूर्वी दहा मिनिटाचं भाषण दक्षिण मुंबईत दिलं होतं. मात्र आता जे बोलतोय ते सत्य व्हावं ही इच्छा आहे. फार वर्षे झाले आम्ही जी मुंबई आधी बघायचो त्याहून अधिक आता सुंदर दिसते आहे. सुंदर मुबईतली कामं शिंदे आल्यापासून अधिक दिसत आहेत. रस्ते क्लिन आहेत.. सुशोभिकरण असो की विकास.. सध्या जलद गतीने होत आहे.

Govinda Arun Ahuja Joins Shivsena
Sanjay Gaikwad : लोकसभेसाठी अर्ज भरल्यानंतर संजय गायकवाडांना मुख्यमंत्र्यांचा फोन, म्हणाले...

दरम्यान, गोविंदा यांना उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. यापूर्वी गोविंदा २००४ ते २००९ या काळात काँग्रेसमधून खासदार बनले होते. त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. पण आता पुन्हा वीस वर्षानंतर गोविंदांची राजकारणाची दुसरी टर्म सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.