Sharad Pawar : परेश रावलांनी सांगितला पवारांचा 'तो' भारावून टाकणारा किस्सा, नेमकं काय घडलं होतं?

actor paresh rawal praised ncp leader sharad pawar marathi news
actor paresh rawal praised ncp leader sharad pawar marathi news
Updated on

बॉलिवुड अभिनेते परेश रावल हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी शेकडो चित्रपटात असंख्य भूमिका अक्षरशः गाजवल्या आहेत, अभिनयापाठोपाठ रावल यांनी राजकारणात देखील हात आजमावला आहे. भाजपकडून खासदार राहिलेल्या परेश रावल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली आहे. यावेळी त्यांनी पवारांचे कौतुक देखील केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात, त्यांच्यावर टिका करणारे आणि त्यांचं कौतुक करणारे दोन्ही लोक देशभरात सापडतात. यादरम्यान बॉलिवुड अभिनेते परेश रावल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. परेश रावल हे लोकसत्ता लोकांकिकाच्या कार्यक्रमात बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

actor paresh rawal praised ncp leader sharad pawar marathi news
NIT Land Scam : CM शिंदेंवर आरोप होतायत तो 'नागपूर न्यास घोटाळा' काय आहे?

नाटकाच्या तिकिटावरील सरकारकडून लावण्यात आलेल्या जीएसटी रद्द करावा यासाठी परेश रावल हे अजित भुरें आणि इतर मराठी कलाकारांसोबत तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते त्यावेळटी आठवण अभिनेते परेश रावल यांनी सांगितेली आहे. रावल यांनी सांगितले की वेळी शरद पवार हेदेखील त्यांच्या सोबत होते.

actor paresh rawal praised ncp leader sharad pawar marathi news
Corona Outbreak : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! लोकांना बेड-औषधं मिळेनात; मृतदेह ठेवायलाही जागा नाही

परेश रावल यांनी यावेळी शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं तोंडभरून कौतुक केलं आहे. रावल म्हणाले की, शरद पवारांसारखा मोठा नेता नाटकवाल्यांसाठी पुढे येतो, हे पाहूनच मी थक्क झालो. त्यांनी ज्याप्रकारे जीएसटी रद्द करण्यासाठी जेटली यांना विनंती केली, ते वाखाणण्याजोगे होते असेही ते म्हणाले.

पुढे परेश रावल यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांनी शरद पवारांना यावरून प्रश्न देखील विचारला की, हे तुमचे मतदार नाहीत, तरी तुम्ही पुढाकार का घेतला यावर शरद पवारांनी "हा कला व संस्कृतीचा मुद्दा आहे" असं उत्तर दिलं होतं. पवारांच्या या उत्तराने भारावून गेल्याचे देखील रावल यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.