Sayaji Shinde: अभिनेता ते नेता! सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; राष्ट्रवादीत झाला दणक्यात प्रवेश

Sayaji Shinde Joins NCP: अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश झाला आहे. तसेच विधानसभेसाठी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
Sayaji Shinde Joins NCP
Sayaji Shinde Joins NCPESakal
Updated on

Sayaji Shinde Joins NCP: अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत ते राज्यात स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी लोक उपस्थित होते. अजित पवारांनी सयाजी शिंदेंचे राष्ट्रवादीत स्वागत केले आहे. तसेच ते येताच एक मोठी जबाबदारीही सोपवली आहे.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आजच आम्हाला दसऱ्याचा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. नाव मराठी असले तरी अनेक भाषेत त्यांच काम आहे. अभिनेते असले तरी आता ते नेते देखील होणार आहे. लोकांच मनोरंजन करणं आलं पण लोकांच्या दुखात समोर यायचं आहे. मराठी माणूस असून दक्षिणात्य सिनेमात त्यांनी झेंडा रोवला असेल, त्यांना तिथली भाषा समजते आणि ते तिथे काम करतात ते त्यांना माहिती आहे.

ते पुढे म्हणाले की, राजकारणात देखील त्यांना कोणतीही कठीणाई वाटणार नाही. महाराष्ट्राला त्यांचा चेहरा माहिती आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांच्या कामांची पावती म्हणून ते आमच्या पक्षात आले आहेत, अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशावर छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Sayaji Shinde Joins NCP
Dasara Melava: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा, जाणून घ्या कुठे कुणाची होणार सभा?

यावर अजित पवार म्हणाले की, मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण सयाजी शिंदे यांचे काही चित्रपट पाहिले आहेत. महाराष्ट्रातून कलाकार पुढे आला आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नाव केल तर मला आनंदच होतो. सयाजी शिंदे यांचं काम समाजात जागरुकता वाढवतं. सरकारमध्ये काम करताना विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क येतो. सह्याद्री देवराई या माध्यमातून ते उपक्रम राबवतात. मी काही भागात त्यांच काम पाहिलं आहे. अनेकदा अनेक तक्रारी येतात. आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. सिद्धिविनायक आणि शिर्डीत गेल्यावर प्रसाद दिला जातो. त्या ऐवजी एक रोपटं प्रसाद म्हणून दिल पाहिजे, असं त्यांनी सुचवलं होतं.

पक्षात त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या निर्णयाचे मला खूप समाधान आहे, असे सांगत विधानसभा निवडणुकीत सयाजी शिंदे आता राज्यात स्टार प्रचारक म्हणून काम करतील, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.