अभिनेत्री आसावरी जोशींचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Actress Asawari Joshi Enterts into NCP
Actress Asawari Joshi Enterts into NCPe sakal

मुंबई : अभिनय क्षेत्रातील कलाकारांचा कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) दिसतोय. आज अभिनेश्री आसावरी जोशी राष्ट्रवादीत (Actress Asawari Joshi) प्रवेश करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे. त्या अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून झळकल्या असून त्यांचा चेहरा घराघरात पोहोचला आहे.

Actress Asawari Joshi Enterts into NCP
राष्ट्रवादीतच प्रवेश का? सुरेखा पुणेकर यांनी सांगितलं 'कारण'

आसावरी जोशींनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिका आणि जाहिरातींमधून अभिनय केला आहे. त्यांची 'स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा' ही मालिका खूप गाजली. तसेच नव्वदच्या दशकात केलेल्या भूमिका देखील गाजल्या. त्यांनी १९८६ मध्ये 'माझं घरं माझा संसार' या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. 2001 मध्ये दुरचित्रवाणीवरील 'ऑफिस-ऑफिस' या हिंदी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली होती. त्यांनी 'सुवरी' या नाटकात अभिनय केला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्या पक्षात प्रवेश करणार आहेत हे यापूर्वीच जाहीर झालं होतं. हा पक्षप्रवेश १५ फेब्रुवारीला होणार होता. मात्र, काही कारणांमुळे त्यावेळी पक्षप्रवेश होऊ शकला. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सुरू आहे. आसावरी जोशी या मालिका आणि चित्रपटातून घराघरात पोहोचल्या आहेत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीला नक्कीच फायदा होईल.

यापूर्वी या कलकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश -

आतापर्यंत जेष्ठ अभिनेत्री सविता माल्पेकर, प्रिया बेर्डे, जेष्ठ अभिनेते विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियदर्शन जाधव, संभाजी तांगडे, सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना सुरेखा कुडची यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी चित्रपट आघाडीत अलिकडच्या काळात राष्ट्रवादी चित्रपट आघाडीत प्रवेश केला होता. आता यामध्ये आणखी एक चेहरा जोडला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com