Adhik Shravan Maas : अधिक मासात करा दानधर्म; महिनाभर काय करावे, नी काय करू नये जाणून घ्या सविस्तर

अधिक महिना (Adhik Shravan Maas) सुरू होत आहे.
Adhik Shravan Maas
Adhik Shravan Maasesakal
Updated on
Summary

अधिक महिन्यामुळे यावर्षी सर्वच सण सुमारे एक महिना पुढे गेले आहेत. यावर्षी अधिक महिना श्रावणाच्या आधी जोडून आला आहे.

सातारा : अधिक महिना (Adhik Shravan Maas) सुरू होत आहे. अधिक श्रावण अन्‌ श्रावण याबाबत अनेक नागरिक संभ्रमात आहेत. मात्र, श्रावण हा या अधिक महिन्यानंतरच असून, अधिक महिन्यात उपासना, दानधर्माची कार्ये जरूर करावीत.

मात्र, ज्याला आपण श्रावणी सोमवार (Shravan Somvar) म्हणतो, ते या महिन्यानंतरच्या निज श्रावणातच करायचे आहेत. दरम्यान, अधिक महिन्यामुळे यावर्षी सर्वच सण सुमारे एक महिना पुढे गेले आहेत. यावर्षी अधिक महिना श्रावणाच्या आधी जोडून आला आहे. हा योग १९ वर्षांनंतर आला आहे.

Adhik Shravan Maas
फडणवीस, बावनकुळेंना मी तलवार-वाघनख दिलंय, कारण शिवरायांनी..; काँग्रेसवर हल्ला करत काय म्हणाले उदयनराजे?

ज्या मराठी महिन्याच्या आधी अधिक महिना आल्यास त्याला अधिक जोडला जातो. यावर्षी श्रावणाच्या आधी अधिक महिना आल्याने त्याला अधिक-श्रावण असे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. तर त्यानंतरचा महिना हा निज श्रावण असल्याचे पंचांगकर्त्यांनी (panchang) म्हटले आहे.

Adhik Shravan Maas
Satara : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! धबधबे पाहायला जाणाऱ्यांवर होणार कारवाई, 'त्या' दुर्घटनेनंतर वनविभाग ॲक्टिव्ह

१८ जुलै ते १६ ऑगस्ट अधिक श्रावण असून, १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत निज श्रावण आहे. दोन्ही श्रावण महिन्यांत आठ सोमवार असले तरी, शिव भक्तांनी निज श्रावणातील चार सोमवार (२१ व २८ ऑगस्ट आणि ४ व ११ सप्टेंबर) करावेत, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

श्रावणात तीन सण आहेत. नागपंचमी (२१ ऑॅगस्ट), रक्षाबंधन (३० ऑॅगस्ट) आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी (सहा सप्टेंबर) आहे. त्याप्रमाणे श्रावणात मंगळागौरीही केल्या जातात. दरम्यान, हिंदू शास्त्राप्रमाणे श्रावण हा पवित्र महिना मानतात. अनेक नागरिक प्राधान्याने श्रावणात मांसाहार टाळतात.

Adhik Shravan Maas
Deepak Kesarkar : B.Ed., D.Ed धारकांसाठी आनंदाची बातमी! शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

अधिक महिनाही पवित्र मानला जातो. विविध उपासना या महिन्यात आवर्जून केल्या जातात. विशेषतः अधिक महिन्यात दानधर्म करावेत, अशी शास्त्राची शिकवण आहे. अनेक नागरिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दानधर्म करतात. तसेच गंगास्नानाचाही लाभ घेत असतात.

अधिक महिन्यात....

दान द्यावे - जावयाला, गाईला वाण देणे, अधिक माहात्म्य वाचणे, आईची पूजा करून आईची ओटी भरणे, देवालयातील देवांना, गंगेला वाण देणे. अधिक महिन्याच्या उपासना कराव्यात.

Adhik Shravan Maas
Dudhsagar falls Video : दूधसागर धबधबा पाहायला जाताय? मग ही बातमी आधी वाचा, अन्यथा उठाबशा काढाव्या लागतील! व्हिडिओ व्हायरल

पूर्ण अधिक महिना गंगास्नानासाठी पवित्र

  • श्रावण महिन्यांतील सोमवार - २१ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ११ सप्टेंबर याच दिवशी श्रावण सोमवार उपवास करायचे आहेत. इतर उपवास, ग्रंथ वाचन, पारायण करावे.

  • श्रावणातील सण - नागपंचमी (२१ ऑगस्ट), रक्षाबंधन (३० ऑगस्ट) आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी (६ सप्टेंबर).

यावर्षी अधिक महिना श्रावणाच्या आधी जोडून आला आहे. हा योग १९ वर्षांनंतर आला आहे. मात्र, श्रावणातील श्रावणी सोमवारसह व्रतवैकल्ये ही पुढील म्हणजे निज श्रावणात करावीत.

वेदशास्त्र संपन्न विवेकशास्त्री गोडबोले - सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.