आदिती तटकरे म्हणाल्या, चौकशीसाठी स्पेशल पथक नेमा; नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची

रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हायअलर्ट जारी झाला आहे
aditi tatkare Latest News
aditi tatkare Latest Newsaditi tatkare Latest News
Updated on

aditi tatkare Latest News मुंबई : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके ४७ रायफल सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल पथक (Special Team) नेमण्याची मागणी आदित्य तटकरे (Aditi Tatkare) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

हरिहरेश्वरच्या परिसरात घातक शस्त्रे असलेली बोट (Boat) सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. परिसरात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या घटनेचा तातडीने एटीएसमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच स्पेशल पथकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

aditi tatkare Latest News
नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांबद्दलचे निर्णय काय सांगतात? भाजपने काय दिले संकेत?

या घटनेनंतर स्थानिक लोकांची सुरक्षा महत्त्वाची झाली आहे. गणपती काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे येथे नागरिकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. परिसरात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सभागृहाच्या माध्यमातून चौकशीसाठी स्पेशल पथक नेमण्याची मागणी केल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितरले.

राज्य सरकारला विनंती करून एटीएसमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. गरज पडल्यास केंद्र सरकार तसेच स्पेशल टीमची मदत घ्यावी. कारण, सनानिमित नागरिकांची गर्दी वाढणार आहे. सभाव्य धोका लक्षात घेऊन चौकशी महत्त्वाची झाली आहे, असेही आदिती तटकरे म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.