Aditya Thackeray : उद्धव ठाकरे आजारी असताना बंडाची तयारी सुरू झाली

जे बंडखोरी करून बाहेर पडले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

Aditya Thackeray Shiv Sawand Yatra : उद्धव ठाकरे आजारी असताना बंडांची तयारी सुरू होती असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आजारी असतानादेखील फोन आणि इतर माध्यमातून राज्यातील कामं केली जात होती. मात्र, असे असतानादेखील विरोधकांकडून आणि आमदारांकडून मुख्यमंत्री भेटत नाही काम होत नसल्याची टीका करत होते. ते शिवसंवाद यात्रेदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray
Mumbai Metro: 'आरे'तच कारशेड होणार; शिंदे फडणवीस सरकारने बंदी उठवली

ते म्हणाले की, जे बंडखोरी करून बाहेर पडले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. त्यामुळे जर काही लाज उरली असेल तर, आमदारकीचे राजीनामे देऊन निवडून येऊन दाखवा असे आव्हानही आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिले आहे. तसेच सर्व काह सुरळीत सुरू असताना पाठीत खंजीर का खूपसला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले सरकार लवकरच कोसळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केले. आमदारांकडून करण्यात आलेली ही गद्दारी केवळ पक्षाशी नव्हे तरस माणुसकीशीदेखील झालेली आहे. आज हे सरकार शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात असल्याचा मोठा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

Uddhav Thackeray
राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक करणाऱ्याला बेड्या

राजकारण जमलं नाही हेच चुकलं

आपल्या खासदार, आमदारांवर लक्ष ठेवण्याऐवजी विश्वास ठेवला हेच आपले चुकले. या बंडखोरांनी कोणताही उठाव केलेला नाही, त्यांनी गद्दारीच केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार आहे, असं सूचक वक्तव्यही आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात सगळं सुरळीत सुरु असतानाही या बंडखोरांनी पाठीत खंजीर का खुपसला, असं म्हणत त्यांनी राजकारण जमलं नाही हेच चुकलं असं भावनिक विधानही त्यांनी यावेळी बोलताना केलं.

तुम्हाला कुठे रहायचं असेल तिथे रहा. मात्र आमदाराकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला समोरे या, त्यावेळी जे काही जनता ठरवेल ते शिवसेनेला मान्य असेल. ज्याला कुणाला परत यायचं असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहे. तुम्ही कधीही येऊ शकता असेदेखील अदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.