"ज्यांना पाचवेळा आमदार, मंत्री बनवलं त्यांनीच गद्दारी केली" - आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादेतील गंगापूर, पैठण आणि सिल्लोड येथे सभा घेत शक्तिप्रदर्शनत केलं.
Aditya Thackeray
Aditya Thackerayesakal
Updated on

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यावर शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंकडून शिवसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन मेळावे घेण्याचं काम सध्या ठाकरेंकडून सुरू असून आज त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर, पैठण आणि सिल्लोड येथे सभा घेत शक्तिप्रदर्शनत केलं आहे. यावेळी त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. ( Shivsena Aditya Thackeray News)

यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे आणि शिवसेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेवेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

Aditya Thackeray
"...म्हणून मी पाकिस्तानला लाथ मारून भारतात आलो" - अबू आझमी स्पष्टच बोलले

पैठण येथे बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "ज्या लोकांना आम्ही पाच वेळा आमदार बनवलं, त्यांच्या सांगण्यावरून मंत्रीही बनवलं त्यांनी आमच्याशी गद्दारी केली." आम्ही पैठणच्या विकासासाठी १४ कोटींचा निधी दिला होता असं बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये बोलताना ते म्हणाले. त्याचबरोबर ज्यांना मी लहानपणापासून बघितलं त्यांनी गद्दारी केली. बंडखोरांनी पाठीत खुपसलेल्या खंजीरीचं दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही अशी खंत ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

"औरंगाबादमध्ये पाच आमदारांनी बंडखोरी केली, आता त्यांच्या जागी पाच नवे आमदार निवडून येणार आहेत. हे सरकार कोसळणार आहे. या गद्दारांना भाजपने वॉशिंगमध्ये टाकून स्वच्छ केलं का?" असा सवाल त्यांनी केला. लाज असेल तर गद्दारांनी राजीनामे द्यावेत आणि परत निवडून दाखवावे असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.