मुंबई : बीकेसी मैदानावर आज शिवसेनेची (Shivsena) जाहीर सभा पार पडत आहे. त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने केलेल्या कामाचा पाढा वाचला. "कोरोनाकाळात बीकेसी मैदानावर या सरकारने रुग्णासाठी सर्वांत मोठं हॉस्पिटल उभं केलंय." असं ते म्हणाले.
"जगावर जेव्हा संकट येतं तेव्हा WHOला देखील धारावी पॅटर्न काय आहे हे दाखवण्यासाठी आपले मुख्यमंत्री असतील, आपले शिवसैनिक असतील." असं म्हणत त्यांनी कोरोना काळात सरकारने केलेल्या कार्याचं आणि धारावी पॅटर्नचं कौतुक केलं. तसंच आज मुख्यमंत्री आपल्या सर्वांचं मास्क खाली उतरवणार आहेत असं सांगितलं.
"महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे होत आले आहेत. देशभरात सलग दोन वेळा देशभरात टॉप ५ आणि टॉप ३ मध्ये आपल्या मुख्यमंत्र्याचं त्यांच्या कार्यामुळे नाव आलं. हे कौतुक त्यांचा मुलगा किंवा एक शिवसैनिक म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून करत आहे." असं ते म्हणाले. "ज्या राज्याने कोरोनाकाळात देशाला दिशा दाखवली त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे." ते म्हणाले.
"कोरोनाकाळात शिवसेनेचा एकही नेता थांबला नाही, प्रत्येक नेता फिरत राहिला, मदत करत राहिला, कोरोना काळातही विकासकामे चालू राहिली, आपल्या महाराष्ट्राचा शाश्वत विकास चालू राहिला, मेट्रोचा विकास चालू राहिला." असं म्हणत त्यांनी सरकारने कोरोना काळात केलेल्या कामाचा पाढा वाचला.
"जेव्हा आपल्या देशात अनेक प्रश्न उपस्थित होत असताना तुम्ही कोणतं सरकार निवडणार आहात? चूल पेटवणारं सरकार की दोन समाजात भांडणं लावणारं सरकार?" असा सवाल त्यांनी सभेतील युवकांना केला. "हिंदुत्वाबद्दल आम्ही जे वचनं आपण देतो ते पूर्ण करतो" म्हणत त्यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.