दिशा सालियान मृत्यू प्रकरण : SIT चौकशीच्या चर्चेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'ये डर अच्छा है!'

देशात विरोधी पक्षातील अनेक लोकांवर असे आरोप केले जातात असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Aditya Thackeray
Aditya Thackeray esakal
Updated on

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या लोकांना भाजप घाबरतं त्याच्यावर घाणेरडे आरोप केले जातात, त्यांना बदनाम केलं जातं. ज्यांच्या बद्दल त्यांच्या मनात भीती आहे त्यांना असेच सतावले आणि बदनाम केले जाते. मीच नाही अशी अनेक लोकं आहेत. देशात विरोधी पक्षातील अनेक लोकांवर आरोप केले जातात.

पण ज्याच्यावर दाऊदचे पार्टनर आहेत, सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला असे आरोप केले जातात, ते सोबत आल्यावर त्यांना उपमुख्यमंत्री, मंत्री करतात. ही भाजपची स्टॅटर्जी आहे. ये डर अच्छा है, ज्यांना घाबरतात त्यांच्यावर असे आरोप करतात असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Aditya Thackeray
Manoj Jarange : "प्रचंड विश्वासघातकी माणूस..."; मनोज जरांगे पाटलांचं नक्कल करणाऱ्या भुजबळांना प्रत्यत्तर

आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्रात बदनामी करण्यासाठी दिशा सालियन आत्महत्या प्रकरण पुन्हा उघडले जात असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूचे प्रकरण त्यांच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्या पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Aditya Thackeray
'भेकडांच्या अंगावर कपडे...'; चप्पलफेक प्रकारावरुन गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया

विधान परिषद सदस्य (एमएलसी) अनिल परब यांनी सांगितले की, दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला आहे. आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी आणि राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेला (यूबीटी) आक्रमक भूमिका घेण्यापासून रोखण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जात आहे, आम्ही याला घाबरत नाही, असा दावा परब यांनी केला.

गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येईल, असे सांगितले होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सालियनने 9 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.