Aditya Thackeray On Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगर येथे काल रात्री भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून महेश गायकवाड आणि त्यांचे एक सहकारी या गोळीबारात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. यादरम्यान विरोधकांकडून सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला जात आहे.
यादरम्यान राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. आदित्य ठाकरे यांनी मागील दोन वर्षात भाजप आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गाटाच्या आमदारांसंबंधीत घटनांची यादीच सोशल मीडीयावर पोस्ट केली आहे.
महाराष्ट्राचा ताबा भाजप पुरस्कृत खोके सरकार ने घेतला.. त्यानंतर सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची ही एक झलक पाहा असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या सहा घटनांची यादीच दिली आहे.
1) काल रात्री एका भाजप आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये मिंधे गँगच्या नेत्यांवर 5 गोळ्या झाडल्या.
२) गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत मिंधे गँगच्या आमदाराने हातात बंदूक घेऊन मुंबईकरांना धमकावले. नंतर पोलीस ठाण्यात त्याच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. बॅलिस्टिक अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. या वर्तनाचे बक्षीस म्हणून त्यांना आता एका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
3) मिंधे गँगच्या आमदाराचा मुलगा मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करताना cctv कॅमेऱ्यात कैद झाला. मुलगा नंतर होर्डिंगवर दिसला, पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही.
4) मिंधे गँगच्या आमदाराच्या लोकांनी उत्तर मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, तर इतरांची भाजपकडून शिकार केली जात होती. स्थानिक bjp नेत्याने (2022 पर्यंत विधान परिषदेत LoP) कार्यकर्त्याला भेट दिली पण पोलीस कारवाई झाली नाही.
5) कुटुंब खंडणीच्या मागण्या मान्य करत नसल्यामुळे एक मिंधे गँगचा नेता आपल्या मुलासोबत एका कुटुंबाला आणि मुलीला त्यांच्या घरात बेदम मारहाण करताना कॅमेऱ्यात सापडला. कारवाई नाही.
6) ठाण्यात मिंधे गँगच्या स्थानिक नेत्यांनी IVF उपचार घेत असलेल्या महिलेला मारहाण करून पोटात लाथ मारली, घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या बेकायदेशीर निर्लज्ज मुख्यमंत्र्यां विरुद्ध सोशल मीडिया पोस्ट केल्यामुळे हे करण्यात आलं. पोलीस कारवाई नाही.
गेल्या 2 वर्षांत, बनावट व्हॉट्सॲप मेसेजवरून अनेक दंगली उसळल्या आहेत. गुंड व्यवसायांना धमकावत आहेत. दुर्दैवाने, अत्यंत असक्षम आणि निर्लज्ज बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे. या गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.