मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी ईडी कारवाईवरून लेटर बॉम्ब (Sanjay Raut Letter To Vice President) टाकला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे माझ्या निकटवर्तीयांवर कारवाई करण्यात आल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. त्यावरच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Aditya Thackeray Reaction to Sanjay Raut Letter)
''राऊतांचं पत्र...''
संजय राऊतांना लिहिलेल्या पत्राबाबत आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांचं पत्रच बोलकं आहे. त्याबाबत अधिक बोलायची गरज नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
चैत्यभूमीवर येणाऱ्या नागरिकांना मोकळी आणि बसण्यासाठी जागा हवी होती म्हणून डेक उभारण्यात आलंय. त्याला आपण माता रमाबाई आंबेडकर व्हीविंग डेक असं नाव देतोय. आणखी काही ठिकाणी असे डेक उभारण्यात येतील. मुंबईतील बजेटमध्ये तरतूद करून आणखी चांगले प्रकल्प उभारू, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई अनलॉक होणार असल्याचं महापौरी किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं होतं. त्यावर देखील आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''मुंबईतील निर्बंध हळूहळू उठतील. १०० टक्के निर्बंध तेव्हाच कमी होतील जेव्हा पूर्ण कोरोना संपेल.'' त्यामुळे आता मुंबई पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे.
संजय राऊतांचं पत्र काय? -
केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून सरकारं अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी काहींनी माझ्यावरही दबाव टाकला. ईडीने आतापर्यंत २८ जणांची बेकायदेशी चौकशी केली आहे. यापुढे मी ईडीचे लोक कसे आर्थिक घोटाळे करतात आणि पैसे गोळा करण्यासाठी कशा पद्धतीने ब्लॅकमेल करतात, याचे पुरावे देणार आहे. हुकूमशाही पद्धतीने राज्य करणार असाल तर तुमची पूर्ण पोलखोल करावी लागेल, असा इशारा राऊतांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.