एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जो कोणी राहुल गांधींची जीभ कापेल त्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे गायकवाड म्हणाले. यानंतर राजकारण तापलं आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे कॉंग्रेस आक्रमक झाला आहे. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. आता यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांबाबत प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.