Aditya Thackeray : माझ्या नावात 'बाळ' लावलं याचा अभिमान; आदित्य ठाकरेंचं 'आदू बाळ' म्हणणाऱ्या शेलारांना जोरदार प्रत्युत्तर

Aditya Thackeray
Aditya Thackerayesakal
Updated on

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर भाजपचे नेते अशिष शेलार यांनी 'आदू बाळा' असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं होतं. यानंतर शेलारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, एका आदू बाळाने यांना केवढं सळो की पळो केलं हे दिसून येत आहे. देशात एक पप्पू नाव ठेवलेलं त्यांने यांना हलवून सोडलं आहे.माझ्या नावात बाळ लावलं याचा मला अभिमान आहे, कारण माझ्या आजोबांचं नाव देखील बाळच होतं. ते रक्तात आहे.

त्यांच्या (भाजप नेते) भाषेतून त्यांचा वैताग आणि त्यांचे खालच्या पातळीचे विचार दिसून येत आहेत. हा भाजपचा नविन चेहरा आहे का? ही भाषा नव्या भाजपची आहे का? जी भाजप आम्ही ओळखत होतो ती वाजपयी आणि अडवाणी यांची होती, त्यांनी त्यांच्या मतदारांना ही भाषा पटवून दाखवावी असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Aditya Thackeray
Ajit Pawar News : अजित पवारांसोबत खडाजंगी झाल्याच्या चर्चांवर भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

प्रश्न विचारल्यानंतर यांना इतकं झोंबतं तिथंच आम्ही यांचा खोटेपणा जणतेसमोर आणला. मी एवढंच विचारलं की तुमचा जीआर सांगतोय की लोनवर शिवरायांची वाघनखं परत आणणार, दुसरीकडे कायमची परत आणणार असं सांगत आहेत. आमच्यामुळे यांना खरं तरी बोलावं लागलं आणि खरा जीआर काढावा लागला, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि अशी एखादी गोष्ट महाराष्ट्रात येत असते तेव्हा त्याचे इथे मंदिर व्हावं आणि मंदिरात त्याचं जतन व्हावं. पण त्याच आधारे जनतेच्या भावनेशी खेळू नये, जे काही आहे ते लोकांसमोर यावं हीच आमची भूमिका आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
Commercial LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या काळात महागाईचा मोठा धक्का! एलपीजी गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागले

शेलार काय म्हणाले होते?

आदू बाळा, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्‍या अधिकार्‍यांचा खर्च केलेला आहे.

जपान दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण टाईमलाईन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौर्‍यामुळे आली आहे. वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी.

बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()