Shiv Sena : आनंद दिघे प्रकरणात संजय शिरसाटांच्या आरोपांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...

aaditya thackeray on sanjay shirsat
aaditya thackeray on sanjay shirsatesakal
Updated on

मुंबईः ठाण्यामध्ये शनिवारी उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला. यावेळी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षावर ठाकरेंनी कडाडून टीका केली. आज शिंदे गटाच्या वतीने संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन जुने मुद्दे उकरुन काढले आहेत.

काय म्हणाले संजय शिरसाट?

स्व. आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला ठाकरे कुटुंबापैकी कुणीही का उपस्थित नव्हतं? असा प्रश्न शिरसाटांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, 'दिघे साहेबांनी आपलं आयुष्य शिवसेनेसाठी वेचलं त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे कुटुंबातील एकही माणूस उपस्थित नव्हता का नव्हता, हा माझा प्रश्न आहे.

aaditya thackeray on sanjay shirsat
Prithviraj Chavan: धक्कादायक! भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य; कारवाईच्या मागणीनंतर माजी मुख्यमंत्र्यांना धमकी

''दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी यांच्याकडे वेळ नव्हता. यांना माहीत होतं अंत्ययात्रेला गेलं तर लोक दगडाने ठेचून मारतील. शिवसेनाप्रमुखांनी दिघे साहेबांवर आणि एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम केलं या लोकांमुळे शिवसेना वाढली.''

शिरसाट पुढे म्हणाले की, दहा शिवसैनिकांची नावं सांगा ज्यांना उद्धव ठाकरेंनी उभं केलं. आपण ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचा विसर उद्धव ठाकरेंना पडला आहे. मराठी माणसाने पाठ फिरवली हे त्यांना समजलं म्हणून उत्तर भारतीयांना आपलंस करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट हे पत्रकारांशी ते बोलत होते.

aaditya thackeray on sanjay shirsat
Sambhaji Bhide Controversy : भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, 'अशा वक्तव्यामुळे संताप...'

आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

स्व. आनंद दिघे यांच्याविषयी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, काही लोकांना किंमत दिली नाही पाहिजे. दीड वर्ष झालं त्यांना अद्याप काहीही मिळालं नाहीये. तिसरा विस्तार झाला तरी ते दूरच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं आदित्य म्हणाले.

आदित्य ठाकरे इतर मुद्द्यांवर बोलतांना म्हणाले की, अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी दिलीय ते खरंय. मात्र असंही विधान भवनात आम्ही प्रश्न विचारत असतो तेव्हा मंत्र्यांचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसून आलेलं आहे. जे मंत्री अभ्यास करत नाहीत, त्यांना ताकीद दिली पाहिजे. एक मंत्री महोदय तर दोन महिला आमदारांवर चिडले होते, हे चुकीचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.