Aditya Thackeray : कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या हे दुर्दैवी; आदित्य ठाकरेंची टीका

Aditya Thackeray
Aditya Thackerayesakal
Updated on

मुंबई - मराठावाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. या बैठकीतून मराठवाड्याच्या विकासासाठी मोठ पॅकेज मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकावर जोरदार टीका केली.

Aditya Thackeray
Sanjay Raut: मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा पास मिळाला; संजय राऊत म्हणाले, मी जाणार, पण...

आदित्य ठाकरे म्हणाले की, मागच्या वर्षी ओला दुष्काळ होता. यावर्षी कोरडा दुष्काळ आहे. शेतकरी हतबल झालेले आहेत. सरकारने काहीही मदत दिलेली नाही. शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी नोटिसा आल्या आहेत. मागच्या वर्षीच्या घोषणेचेही पैसे आले नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

Aditya Thackeray
Cabinet Meeting : मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले इतके वर्ष माशा...

मराठवाड्यातील बैठकीवर आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून काहीही अपेक्षा नाही. याउलट मंत्रिपदांसाठी भांडणे सुरू आहेत. मुळात शेतकरी, महिला अत्याचार आणि उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. आजही ५० हजार कोटींच्या घोषणा होतील. मात्र घोषणा या घोषणाच राहतात, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान जनतेला फायदा काय, असा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांचं विमान वापरण्यावर बदल केला आहे. आता घरचे कार्यक्रम असेल तर त्यासाठीही इतर नेत्यांना विमान वापरता येणार आहे. यासाठी लागणारा पैसा जनतेचा असल्याचं आदित्य यांनी म्हटलं.

गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ होता. त्यावेळी आम्ही सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता देखील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे की, नाही असा प्रश्न पडतो. आज परिस्शिती अशी आहे की, कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहे. हे दुर्दैव आहे, असंही आदित्य यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.