Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंनी शंभर कोटी घेतले; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

राज्यात सत्तासंघर्षानंतर आदित्य ठाकरे ५० खोके एकदम ओके म्हणत शिंदे सरकारवर सातत्याने हल्लाबोल करताना दिसतात.
Ramdas Kadam
Ramdas Kadamesakal
Updated on

राज्यात सत्तासंघर्षानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे ५० खोके एकदम ओके म्हणत शिंदे सरकारवर सातत्याने हल्लाबोल करताना दिसत आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे नेते राम कदम यांनी शंभर खोके कोठून घ्यायचे हे त्यांना चांगलचं माहिती असे म्हणत आदित्य ठाकरेंसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. (aditya thackeray took hundred crores allegation of ramdas kadam )

आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरी दौऱ्यानंतर रामदास कदम यांनी खेडमध्ये बोलताना त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे शंभर कोटी रुपये घेतले, असा आरोप रामदास कदम यानी केला आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणारे पत्रही दिल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

तसेच, शंभर खोके कोठून घ्यायचे हे त्यांना चांगलचं माहिती आहे.आता कोकणात येऊन गद्दार आणि खोक्यांची भाषा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये. अडीच वर्षात ते कधीही बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री आणि बेटा मंत्री, नेता बाहेर", अशी टीका रामदास कदम यांनी केली.

यासोबतच, एका वृत्तसंस्थेशी बोललताना, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडलं असतं तर सगळे आमदार तुमच्याकडे आले असते. उद्धव ठाकरेंना मी तसा शब्दही दिला होता. मात्र ऐनवेळी मातोश्रीवर शरद पवार आले आणि उद्धव ठाकरेंनी निर्णय बदलला, असा किस्सा रामदास कदम यांनी सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.