आदित्य ठाकरे फिल्मी स्टाईल म्हणाले, हम शरीफ क्या हुए...

Aditya Thackeray warns rebels
Aditya Thackeray warns rebelsAditya Thackeray warns rebels
Updated on

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांवर विश्वास ठेवला. त्यांना पुढे केले. मात्र, त्यांच्या चांगुलपणाचा फायदा बंड करणाऱ्यांनी घेतला. यावरून मला एकच डायलॉग आठवतो ‘हम शरीफ क्या हुए...’ असे म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोरांना इशारा दिला. (Aditya Thackeray warns rebels)

युवा सेनेच्या कार्यकारिणीला संबोधित करताना आदित्य ठाकरे बोलत होते. आता खोटारडेपणा महाराष्ट्र सहन करणार नाही. हिंमत असेल तर आधी समोर या आणि बोला. गुवाहाटीमधून बोलण्याची गरज नाही. बंडखोरांमध्ये एवढी हिंमत असती तर ते मुंबईत असते. बोलण्यासाठी हिंमत लागते, असेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

Aditya Thackeray warns rebels
उज्ज्वल निकम यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य; म्हणाले...

कोणत्याही गोष्टीसाठी हिंमत दाखवणे गरजेचे आहे. बंड करण्याआधी बोलायचे असते. महाशक्तीची ताकद वगैरे ते बोलत आहे. असे बोलून काही होत नाही. खरे शिवसैनिक असते तर मुंबईतून गेलेच नसते. म्हणूनच मी खोटारडेपणाची चिरफाड करायला निघालो आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

बंड केलेल्या आमदारांचं खाण्याच बिल आठ लाख रुपये येत आहे. बाकीच्या बिलांविषयी काही बोलणार नाही. कोठून येतो एवढा पैसा. या बंडात भाजपचा हात नाही, असे सांगितले जात आहे. मग भाजपचे मंत्री बंडखोर आमदारांना कसे भेटतात. आसामचे मुख्यमंत्री बंडखोरांना कसे भेटायला जातात, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. सुरतमध्ये भाजपचे नेते बंडखोरांना कसे भेटले, असेही आदित्य (Aditya Thackeray) म्हणाले.

Aditya Thackeray warns rebels
आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती

तुम्ही शिवसैनिक (Shiv sena) आहात. बंड करायचाच होता तर मुंबईत करायचा असता. सुरतला पळून जाण्याची गरज नव्हती. तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात. तुम्हाला पळून जाणे शोभत नाही. सुरतवरून गुवाहाटीत पळून गेले. येथे येऊन बोला, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()