Aaditya Thackeray : ''आयपीएस अधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या नगरसेवकांवर दबाव'', आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

aditya thackeray
aditya thackeray esakal
Updated on

मुंबईः ठाकरे गटाच्या वीतने आज मुंबई महानगर पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबई पालिकेत सुरु असलेल्या भ्रष्टाचारावरुन ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं. आपलं सरकार आल्यानंतर या घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, खोके सरकारच्या भूतांना पळवून लावायचं आहे, त्यामुळे आज हनुमानाचं दर्शन घेऊन आलोय. वर्ष झालं महापालिकेत महापौर नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरकारभार सुरु आहे. यावेळी त्यांनी दाढी खाजवून एकनाथ शिंदेंवर टीका केली. शिंदेंचं गुत्तेदार पोसण्याचं काम सुरु असल्याचा घणाघात त्यांनी केला.

aditya thackeray
ShivSena Dhadak Morcha: "मुंबई महापालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर"; राऊतांचं भाजप-शिवसेनेला आव्हान

''महापालिकेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात आम्ही राज्यपालांकडे तक्रार केलेली आहे. आम्ही चौकशी करण्याची मागणी केली असून राज्यपालांनी चौकशीचं आश्वासन दिलेलं आहे. तरी अद्याप काही निर्णय झालेला नाही'' असं आदित्य ठाकरे म्हणाले.

aditya thackeray
Buldhana Bus Accident: 'समृद्धी'वरील अपघात प्रकरणी मोठी अपडेट; चालकाविरोधात गुन्हा दाखल

आदित्य पुढे म्हणाले की, मुंबईत कुठेच कामं दिसत नाहीत. फक्त दोघांचे फोटो दिसत आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्षांतरासाठी आयपीएस अधिकाऱ्यांकडून ऑफर येत आहेत. त्याचे कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वतीने ऑफर दिल्या जात आहेत.

परंतु आता महापालिकेवर शिवसेनेची सत्ता येणार आहे. जी चोरी तुम्ही केलीत ना ती आमच्या नजरेत आलेली आहे. ज्या दिवशी आमचं सरकार आलं तुम्हाला आत घेणार आणि तुमची जागा दाखवणार, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.