Assembly Monsoon Session: BMC मध्ये स्ट्रीट फर्निचर घोटाळा, आदित्य ठाकरे यांचे आरोप ! नेमका घोटाळा काय?

Aditya Thackrey: अनावश्यक ठिकाणी खर्च केल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप
Aditya Thackrey
Aditya ThackreyEsakal
Updated on

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालंय. अधिवेशनाचा पहिला दिवस गदारोळात गेला आणि पहिल्या दिवशी दोन्ही सदनाचे कामकाज तहकूब करण्यात आलं. आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत २६३ कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाल्याचा आरोप काही महिन्यांआधी केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाल्याचा दावा केला.

यावेळी त्यांनी २६३ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. मुंबई शहराच्या सुशोभिकरणासाठी बेंचेस, कुंड्या खरेदी करण्याची निविदा काढण्यात आली होती.

नेमका घोटाळा काय?

आदित्य ठाकरे या घोटाळ्याबद्दल सांगताना म्हणाले की, " रस्ताच्या बाजूला लावण्यासाठी स्ट्रीट फर्निचर वापरलं जातं. यामध्ये बेंच,झाडाच्या कुंड्या आणि कचरा कुंड्या यांचा समावेश होतो. याचं टेंडर सध्या सीपीडीने (सेंट्रल प्रोक्योरमेंट डिपार्टमेंट) काढलंय.

मुंबई महानगर पालिकेत आरोग्य विभागात दवाखान्यासाठी, औषधांसाठी जे काही आवश्यक गोष्टी आहेत, ते मिळवून देण्याचं काम सीपीडीचं असतं. यंदा धक्कायदायक बाब अशी आहे की, रस्त्यांच्या विभागासाठी सीपीडी प्रोक्योरमेंट करत आहे.

याआधी झालेल्या ६०८० कोटीच्या घोटाळ्यात स्ट्रीट फर्निचरचा उल्लेख नाहीये. स्ट्रीट फर्निचरमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, याचं उत्तर मिळालं नाही. या निविदेत सांगण्यात आलेल्या १३ गोष्टी कोणत्या हे समजलेलं नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न झाल्याने नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या जागा मोकळ्या आहेत, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं मिळू शकले नाही."

Aditya Thackrey
Maharashtra Assembly Session: राष्ट्रवादीसाठी विधिमंडळात एकच कार्यालय; अजित पवार गट अन् शरद पवार समर्थक आमदार एकत्र बसणार?

या गोष्टी कोणत्या किमतीला खरेदी करण्यात आल्यात हेही सांगण्यात आलं नाही. या टेंडरसाठी बोली लावताना एक अट घालण्यात आलीये की या १३ गोष्टी एकाच कॉन्ट्रॅक्टरने पुरवल्या पाहिजेत.ज्यामुळे कॉन्ट्रॅक्टरची यादी तिथेच कमी होतीये. त्यात डिपॉझिटची रक्कम साडेपाच कोटी ठेवण्यात आली आहे.

या टेंडरमध्ये कुंड्या आणि बेंचवर जास्त भर दिला आहे. वार्ड, नगरसेवकांच्या फंडमधूनही बेंच खरेदी केले जातात. मग अधिकच्या बेंचची गरज काय? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

Aditya Thackrey
Monsoon Session : विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या दुसऱ्या फळतील नेत्यांना संधी; 'ही' नावे चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.