Sanjay Raut : संजय राऊतांना दिलासा! जामीन रद्द करण्यासाठी ईडीच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब

Sanjay Raut
Sanjay Raut esakal
Updated on

Sanjay Raut : शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह प्रविण राऊत यांच्यावर गोरेगाव येथील पत्रा चाळमधील रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) उपस्थित संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती.

दरम्यान संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. ईडीच्या याचिकेवरील सुनावणी आता 11 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हाय कोर्टात धाव घेतली होती. संजय राऊत, प्रविण राऊत यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी ईडीने केली होती.

Sanjay Raut
IRS Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना ५ जुलै पर्यंत ED कोठडी!

काय आहे प्रकरण?

2010 मध्ये, प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीतील 25 टक्के हिस्सा एचडीआयएलला विकला. त्यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डरांना विकण्यात आले. प्रवीण राऊत यांना एचडीआयएल समूहाकडून 112 कोटी रुपये मिळाले होते, त्यापैकी 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आले होते.

पत्रा चाळमधील रहिवाशांची घरे पाडून त्यांना बेघर करण्यात आले. त्यांना वेळेवर सदनिका देण्यात आल्या नाहीत. बिल्डरांनी भाडेकरूंना भाडे देणेही बंद केले, अस आरोप ईडीने केला आहे.

Sanjay Raut
Mumbai Rain: मुंबईत पहिल्याच पावसात पाणी का तुंबलं? महापालिका आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.