Law Degree: १९ वर्षांनी बदलला विद्यापीठाने नियम! ४० टक्के गुण पडले तरी मिळणार ‘विधी’ची पदवी; पण, वस्तुनिष्ठऐवजी वर्णनात्मक प्रश्न

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित विधी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आता ५० टक्के नवे तर सर्व वर्षांचे मिळून सरासरी ४० टक्के गुण मिळाले तरी पदवी मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी यंदापासून होणार आहे.
law degree
law degreesakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित विधी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आता ५० टक्के नवे तर सर्व वर्षांचे मिळून सरासरी ४० टक्के गुण मिळाले तरी पदवी मिळणार आहे. बोर्ड ऑफ डिनच्या बैठकीत विधी अभ्यास मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी यंदापासून होणार आहे.

पुणे, मुंबईसह बहुतेक अकृषिक विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमातील विधी विषयासाठी ५००पैकी सरासरी ४० टक्केच गुणांनाच पदवी दिली जाते. मात्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ही अट ५० टक्क्यांची होती.

हा निकष बदलावा, अशी मागणी प्रयास बहुद्देशीय संस्थेने विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. त्यावर ‘सकाळ’नेही वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर विधी अभ्यास मंडळाच्या दोन बैठका पार पडल्या.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला. अखेर विद्यापीठ स्थापनेपासूनचा निर्णय बदलून आता विधी पदवीसाठी सरासरी ४० टक्के गुणांचा नियम करण्यात आला आहे.

आता विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास त्यांच्या पदवीच्या कालावधीत शेवटच्या वर्षी गुणांची सरासरी ४० टक्के आल्यास त्यास पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

विद्यापीठाने घेतला विद्यार्थीहिताचा निर्णय

बोर्ड ऑफ डीनच्या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय झाला असून चालू शैक्षणिक वर्षांपासून विधी अभ्यासक्रमाच्या पदवीसाठी ४० टक्के गुणांचा निकष लागू होणार आहे. मुंबई, पुणे विद्यापीठाप्रमाणे आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातही विद्यार्थीहिताचा निर्णय झाला असून आमचा पाठपुरावा यशस्वी झाल्याचा आनंद आहे.

- सचिन शिंदे, अध्यक्ष, प्रयास संस्था, सोलापूर

law degree
ISRO Career : वैज्ञानिक होऊन इस्रोमध्ये करिअर करायचंय? 'हे' कोर्सेस ठरतील फायद्याचे

वस्तुनिष्ठऐवजी वर्णनात्मक प्रश्न असणार

विधी अभ्यास मंडळाने ‘विधी’च्या पदवीसाठी एकूण वर्षांतील गुणांची सरासरी (टक्केवारी) ५० ऐवजी आता ४० टक्के केली आहे. विद्यापीठ स्थापनेनंतर १९ वर्षांनी हा निकष बदलण्यात आला आहे.

त्यामुळे ‘विधी’ची पदवी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढेल आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वस्तुनिष्ठ प्रश्नांऐवजी आता प्रश्नपत्रिकेत वर्णनात्मक प्रश्न असणार आहेत. तसा निर्णय झाल्याची माहिती प्र-कुलगुरु डॉ. गौतम कांबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.