Ajit Pawar: अजित पवारांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये कोणता मोठा बदल केला जाणून घ्या

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
 ajit pawar poliical news
ajit pawar poliical news Sakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ विधी सोहळा पार पडला आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (Latest Marathi News)

त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. अजित पवार यांनी आपल्या बायोमध्ये उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या अकाऊंटमध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्या अकाऊंटवरील हा बदल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.(Latest Marathi News)

ajit Pawar Twitter
ajit Pawar Twitter Esakal
 ajit pawar poliical news
NCP Leader: शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री म्हणून अदिती तटकरेंनी घेतली शपथ

अजित पवार यांना आज राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. आज एकूण 9 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या सर्व मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात येणार आहे.(Latest Marathi News)

 ajit pawar poliical news
Ajit Pawar: राज्यातील राजकीय भूकंपानंतर विरोधकांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष; आता विरोधी पक्षनेतेपद...

कोणी शपथ घेतली?

अजित पवार - उपमुख्यमंत्री

छगन भुजबळ - मंत्री

हसन मुश्रीफ - मंत्री

दिलीप वळसे पाटील - मंत्री

धनंजय मुंडे - मंत्री

अदिती तटकरे - मंत्री

अनिल भाईदास पाटील - मंत्री

बाबुराव अत्राम - मंत्री

संजय बनसोडे - मंत्री

 ajit pawar poliical news
Devendra Fadanvis: उपमुख्यमंत्री पद डावलून देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत वर्णी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.