Balasaheb Thorat: अशोक चव्हाण गेले आता बाळासाहेब थोरातांकडे महत्त्वाची जबाबदारी; मल्लिकार्जुन खरगेंचा आला फोन

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील एक मोठे नाव होते. त्यांनीच पक्षाचा हात सोडल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. (after ashok chavan resignation Balasaheb Thorat will have important responsibility)
after ashok chavan resignation Balasaheb Thorat will have important responsibility nana patole distress in congress
after ashok chavan resignation Balasaheb Thorat will have important responsibility nana patole distress in congressSakal
Updated on

मुंबई- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील एक मोठे नाव होते. त्यांनीच पक्षाचा हात सोडल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. मात्र, या घटनेनंतर काँग्रेस डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी येणार आहे. (after ashok chavan resignation Balasaheb Thorat will have important responsibility nana patole distress in congress)

बाळासाहेब थोरात यांना राज्यसभा निवडणुका आणि सध्याच्या संघटना बांधण्याची जबाबदारी मिळणार असल्यातं कळत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याकडून थोरात यांना संपर्क साधण्यात आला आहे. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे वाढलेल्या नाराजीवर दिल्ली हायकमांडकडून सारवा सारवीचा प्रयत्न सुरु झाला आहे.

after ashok chavan resignation Balasaheb Thorat will have important responsibility nana patole distress in congress
Ashok Chavan Joining BJP: भाजपसोबत नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करतोय; पक्ष प्रवेशाआधी अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांचा निर्णय होणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपचा हात धरलाय, पण त्यांच्यासोबत इतर काही काँग्रेसचे आमदार देखील त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. अशात काँग्रेसकडून आमदारांशी संपर्क साधला जात आहे. संघटना बांधणीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

after ashok chavan resignation Balasaheb Thorat will have important responsibility nana patole distress in congress
Ashok Chavhan Joining BJP: 'एक चव्हाण गेल्याने फरक पडत नाही', काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये धावपळ सुरु झाली आहे. काँग्रेस नेत्यांची आज बैठक पार पडली. पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस यावर भाष्य करणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना म्हटलंय की, एक व्यक्ती गेल्याने पक्षाचा काहीही तोटा होणार आहे. तसेच मरेपर्यंत मी काँग्रेसमध्ये असेन अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला हा मोठा राजकीय धक्का आहे. मराठवाड्यातील एक बडा नेता म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख आहे. वडील शंकरराव चव्हाण यांच्यापासून अशोक चव्हाण यांची नाळ काँग्रेससोबत जोडली गेली होती. काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत अशोक चव्हाण यांचा समावेश असायचा. मात्र, तरी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.