Sameer Wankhede : "देशभक्त असल्याची शिक्षा..."; CBI छापेमारीनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले
Sameer Wankhede
Sameer Wankhedeesakal
Updated on

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वानखेडे यांच्यावर सीबीआयने दोन दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात इतर अनेक अधिकारी आणि खासगी लोकांचीही नावं समोर आली आहेत. सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्या घरावर एक दिवस आधी छापा टाकण्यात आला होता. आता यासंदर्भात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

देशभक्त असल्याची शिक्षा मिळत असल्याचे समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आणि तब्बल 13 तास चौकशी केली. वानखेडे 2021 पासून चर्चेत आहे, जेव्हा त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना मुंबईतील क्रूझवर अटक करण्यात आली होती.

समीर वानखेडे यांनी 'आज तक'ला प्रतिक्रिया देताना म्हंटलं की, "सीबीआयने माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि 12 तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. छापेमारीमध्ये 18 हजार रुपये आणि मालमत्तेसंदर्भातील काही कागदपत्रे सीबीआयने जप्त केली. मी सेवेत रुजू होण्यापूर्वी ही मालमत्ता खरेदी केली होती. देशभक्त असल्याची मला शिक्षा मिळत आहे, असं ते म्हणालेत."

Sameer Wankhede
Basavaraj Bommai Resignation CM Post : महाराष्ट्राला त्रास देणाऱ्या बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने अंधेरीतील माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांना काहीही सापडलं नाही. सीबीआयच्या सात अधिकाऱ्यांच्या आणखी एका पथकाने माझ्या सासरच्या घरीही छापे टाकले. माझे सासू सासरे वृद्ध आहेत असंही ते म्हणालेत.

Sameer Wankhede
Akola: अकोल्यात रात्री दोन गटात राडा; दगडफेक जाळपोळ, दोन जण जखमी

आर्यन खानला ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात अडकवू नये म्हणून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात, लोकसेवकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7, 7A आणि 12 तसेच, भारतीय दंड संहितेच्या कलम 120B (गुन्हेगारी कट) आणि 388 (धमकीनं जबरदस्तीनं खंडणी) नुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Sameer Wankhede
Karnataka Election Result : DK शिवकुमार तब्बल लाख तर माजी मंत्री गुंडुराव फक्त 105 मतांनी विजयी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()