12 वर्षांवरील मुलांचे लसीकरण ICMR च्या परवानगीनंतरच : टोपे

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा असे देखील टोपे म्हणाले.
Vaccination
Vaccination sakal
Updated on

जालना : राज्यात सध्या 15 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोना (Corona Vaccination ) लस देण्यात येत असून, 12 वर्षांवरील मुलांसाठी (Child Corona Vaccination) ज्यावेळी ICMR लसीकरणाला परवानगी देईल, तेव्हापासून या मुलांचे लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी सांगितली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. (Rajesh Tope On 12 plus years children Vaccination )

Vaccination
मार्च अखेरीस राज्यात कोरोनाच अंत : राजेश टोपे

टोपे म्हणाले की, जगात लहान मुलांपासून सर्वांना लसीकरण करण्यात येतंय या संदर्भात केंद्र सरकारने (Central Government) निर्णय घ्यावा, त्याची राज्य सरकार अंमलबजावणी करेल असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं. राज्यात काही कोरोनारुग्णांमध्ये ब्रेन स्टोन (Brain Stone) आढळून येत असल्याच समोर आले असून, याबाबत निष्कर्षाअंतीच बोलता येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Children Corona Vaccination Latest News In Marathi)

Vaccination
"आतापर्यंत देशात साडेचार कोटी मुलांचे लसीकरण"

देशात 12-14 वर्षे वयोगटाची संख्या 7.5 कोटी

सध्या देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन आणि प्रौढांचे लसीकरण (corona vaccination) सुरू आहे. देशात 12-14 वर्षे वयोगटातील अंदाजे लोकसंख्या 7.5 कोटी आहे. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलांची लोकसंख्या देखील तितकीच आहे, ज्यांचे सध्या लसीकरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे (NTAGI) अध्यक्ष डॉ एनके अरोरा म्हणाले होते की, भारतात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चमध्ये सुरू होऊ शकते. मार्चपर्यंत 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले होते. अशा स्थितीत पुढील टप्प्यात 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करणे अपेक्षित आहे.

Vaccination
जय महाराष्ट्र! राजपथावरील परेडमध्ये चित्ररथाला बहुमान

डॉ. अरोरा यांच्या मते, देशात 15-18 वयोगटातील 7.5 कोटी लोक आहेत. यापैकी 3.45 कोटी तरुणांना कोरोनाची लस मिळाली आहे. किशोरवयीन मुलांना कोव्हॅक्सिन (Covaxin) दिले जात असल्याने, त्यांना 28 ते 42 दिवसांत लसीचा दुसरा डोसही दिला जाईल. म्हणजेच 15 ते 18 वयोगटातील लसीकरण मार्चपर्यंत पूर्ण होईल. यानंतर 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू करता येईल. देशात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोनाविरोधी लसीकरण सुरू करण्याचा कोणताही निर्णय केंद्र सरकारने अद्याप घेतलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.