Maharashtra Politics: सामनाच्या अग्रलेखावर मविआच्या टिकेनंतर ठाकरे गटाच्या नेत्याचं स्पष्टीकरण म्हणाले, 'अग्रलेख राष्ट्रवादीवर...'

शरद पवार यांचा राजीनामा आणि राष्ट्रवादी यांच्यावर सामनाचा अग्रलेख लिहण्यात आला आहे
Uddhav Thackeray and Sharad Pawar
Uddhav Thackeray and Sharad PawarEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आणि राजकारण ढवळून निघालं. अशातच आता पवारांच्या या निर्णयावरून अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. अशातच आज ठाकरे गटाचं मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखात आज शरद पवार आणि राष्ट्रवादी यावर भाष्य करण्यात आलं आहे. यावरून आता महाविकास आघाडीत नाराजीचे सुर दिसून येत आहेत.

पवार पुन्हा आले! भाजप लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच!, अशा स्वरूपाचा आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षातील नेत्यांच्या नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहेत. सामनाच्या अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनीही अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी टिकवायची आहे म्हणून मी राऊत यांच्यावर काही बोलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या अग्रलेखावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख हा भारतीय जनता पार्टीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरती लिहिलेला नाही. सामना हे वृत्तपत्र आहे. त्यात काय लिहायचं आणि काय लिहायचं नाही हा अधिकार वृत्तपत्राच्या संपादकांचा आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे.

तर छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेवरही दानवे बोलले आहेत. पाठीमागे संजय राऊत यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न विचारण्यात येत होता. त्यावेळी छगन भुजबळ का नाही बोलले? महाविकास आघाडी बनवण्यात संजय राऊत यांचा रोल खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. संजय राऊत आणि राष्ट्रवादी अशी कोणतीही धुसफूस सुरू नाही. संजय राऊत इतकंच म्हणाले होते की, शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, अत्यंत सकारात्मकपणे संजय राऊत शरद पवारांबद्दल आपली मतं मांडतात, असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे.

Uddhav Thackeray and Sharad Pawar
Sharad Pawar: शरद पवारांच्या बोलण्याचं भाजप नेत्यांना टेन्शन; 'फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलू नये...पवार मोठे नेते

सामनाच्या अग्रलेखावर शरद पवारांची प्रतिक्रिया

सामनाचा आजचा अग्रलेख मी काही वाचला नाही. वाचल्यानंतर मी माझं मत देईल. सामना किंवा त्यांचे संपादक आम्ही एकत्र काम करत असतो. पण संपूर्ण माहिती घेऊन नंतरच त्यावर भाष्य करणं, योग्य राहील. नाहीतर उगीच गैरसमज होतात. माझी खात्री आहे, त्यांची भूमिका ऐक्याला पूरक असेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray and Sharad Pawar
Thackeray Vs Congress: उद्धव ठाकरे, मविआतील पक्षाला कमजोर करण्याचं काम करतायत; नाना पटोलेंचा गंभीर दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.