Ajit Pawar: 'मी त्या गाडीत नव्हतोच', शरद पवारांसोबतच्या 'त्या' भेटीत काय घडलं? अजित पवारांनी सांगितलं स्पष्टच

चोरडियांच्या बंगल्यात शरद पवारांसोबत कशी झाली भेट? अजित पवारांनी दिली माहिती
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात घडामोंडींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी (ता.१२) पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथील अतुल चोरडिया यांच्या घरी भेट झाली होती. ही भेट झाल्याचे समोर आल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. या बैठकीमुळे शरद पवार यांच्याबद्दल इंडिया आघाडीत संभ्रम निर्माण झाला. शरद पवार यांची नेमकी भूमिका काय? ते भाजपासोबत की, इंडियासोबत? असा प्रश्न इंडियातील पक्षांच्या मनात निर्माण झाला होता.

त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर शरद पवारांनी आपली भुमिका स्पष्टपणे मांडली आहे. मी भाजपसोबत जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यानंतरही राज्याच्या राजकारणात शरद पवार अजित पवारांना वारंवार भेटतात, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या भेटीबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे.

Ajit Pawar
Rajgad Trekker Accident : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

अजित पवार आज कोल्हापूरात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. अजित पवार बोलताना म्हणाले की, 'पुण्याच्या बैठकीच मनावर घेऊ नका. शरद पवार हे पवार कुटुंबातील ज्येष्ठ वडिलधारी व्यक्ती आहेत. मी त्यांचा पुतण्या आहे. माध्यमं अशा भेटीला प्रसिद्धी देतात. त्यातून समज-गैरसमज निर्माण होतात. फार तिथे काही वेगळं घडलं असं समजू नका'.

तर या बैठकीत राजकीय घडामोडींवर चर्चा झाली नाही, पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका असंही पुढे अजित पवार म्हणालेत. चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे. चोरडिया हे पवारसाहेबांचे क्लासमेट आहेत. चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होते. त्यावेळी जयंत पाटील देखील त्याठिकाणी पवारसाहेब यांच्यासोबत होते असे अजित पवार म्हणाले. दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाणे काय चुकीचे? असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar
Jitendra Awhad: PM मोदी म्हणाले, 'मी पुन्हा येईन..', आव्हाड म्हणाले 'येणार नाहीत याची काळजी...'

'जनतेला सांगेन, यापुढे केव्हाही भेटलो तर त्यातून कुठलाही अर्थ काढू नका. ती कौटुंबिक भेट असते मी लपून गेलेलो नाही, मी उजळ माथ्याने फिरणारा आहे' असंही पुढे अजित पवार म्हणाले आहेत.

अपघात झालेल्या गाडीत मी नव्हतो

तर भेटीनंतर अजित पवार बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला असं अनेक माध्यमांनी सांगितलं होतं. त्यासंबधीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यावर अजित पवार म्हणाले, "तुम्ही मला लपून गेल्याचं कुठे बघितलं?. मी उद्या तुमच्या घरी आलो, तर कधी निघायच हे मी ठरवणार. मी बैठकीला गेला हे मान्य करतो. पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Marathi News Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.