मुंबई: वडिलांची नारायण राणेंची (narayan rane) जामिनावर सुटका झाल्यानंतर आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी एक टि्वट केलं आहे. या टि्वटमधून त्यांनी नेहमीप्रमाणे विरोधकांवर शाब्दीक हल्ला न चढवता, दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘राजनीती’ चित्रपटातील (Rajniti film) मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) राजकीय सभेला संबोधित करत असतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधील डायलॉग खूप सूचक आहे. भविष्यात शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष कुठल्या दिशेने जाणार, त्याचे संकेत या टि्वटमधून मिळत आहेत.
'जेव्हा तुम्ही आकाशाकडे बघून थुंकता, तेव्हा तीच थुंकी तुमच्या चेहऱ्यावर पडते. करारा जवाब मिलेगा' हा डायलॉग त्यांनी टि्वटवर पोस्ट केलाय. या टि्वटमधून वेगवेगळे राजकीय तर्क-वितर्क नक्कीच काढले जातील. पण यापुढे महाराष्ट्रात सूडाचं राजकारण पाहायला मिळू शकते. काल नारायण राणेंना अटक झाली, त्यावेळी त्यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे सोबत होते. नारायण राणे जेवत असताना, पोलीस त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले.
त्यावेळी निलेश राणेंनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. आमदार नितेश राणे काल रत्नागिरीच्या दिशेने निघाले, त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं. पुढे जाऊ दिलं नाही. त्यावेळी त्यांनी तिथून एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane bail) यांना अखेर काल रात्री उशिरा महाड सत्र न्यायालयानं (mahad court) जामीन मंजूर केला. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक (arrest) करण्यात आली होती. काल दिवसभर शिवसेनेने राणेंच्या या वक्तव्याविरोधात राज्यभर हिंसक आंदोलनं केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.